घरताज्या घडामोडीगोव्यात भ्रष्टाचार नाही! आमची इथे गरजच काय? सीबीआय अधिकाऱ्यांना पडलाय प्रश्न

गोव्यात भ्रष्टाचार नाही! आमची इथे गरजच काय? सीबीआय अधिकाऱ्यांना पडलाय प्रश्न

Subscribe

गोव्यात मागील 5 वर्शांपासून लाचखोरीची किंवा बेहिशोबी मालमत्तेची एकही तक्रार नसल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्यक्षात चार ते पाच अधिकाऱ्यांकडे केवळ भ्रष्टाचाराची प्रकरणे चौकशीसाठी आहेत.

गोव्यात मागील 5 वर्शांपासून लाचखोरीची किंवा बेहिशोबी मालमत्तेची एकही तक्रार नसल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्यक्षात चार ते पाच अधिकाऱ्यांकडे केवळ भ्रष्टाचाराची प्रकरणे चौकशीसाठी आहेत. याबाबत गोवा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी स्वत: माहिती दिली आहे. (Goa CBI Not Found A Single Case Of Corruption In Five Years)

गोवा सीबीआयचे एसपी आशिष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 5 वर्षांपासून आमच्याकडे लाचखोरीची किंवा बेहिशोबी मालमत्तेची एकही तक्रार आलेली नाही. याचा स्पष्ट अर्थ गोव्यात भ्रष्टाचार नाही.
त्यामुळे गोवा सीबीआय अधिकाऱ्यांकडे अनोखी समस्या निर्माण झाली आहे.

- Advertisement -

“मला गोव्यातील कोणत्याही भ्रष्ट कारवायाबाबत कधीही फोन आलेला नाही. ज्यामध्ये मी हस्तक्षेप करावा. जनतेची किंवा प्रसारमाध्यमांची कोणतीही तक्रार आली नाही. गोव्यात भ्रष्टाचार नाही आणि इथे आमची गरज नाही”, एसपी आशिष कुमार यांनी म्हटले.

- Advertisement -

दरम्यान, बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना एसपी (सीबीआय) आशिष कुमार यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात आमच्याकडे फक्त तीन गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये दोन प्रकरणे कॅनरा बँकेतील कर्ज फसवणुकीशी संबंधित आहेत आणि एक प्रकरण बेहिशोबी मालमत्तेशी संबंधित आहे. गेल्या चार वर्षांत आमच्याकडे लाचखोरीची एकही तक्रार आलेली नाही. शेवटची तक्रार 2018 मध्ये आली होती. अशा स्थितीत गोव्यात रामराज्य आले असे म्हणता येईल.


हेही वाचा – शरद पवार आणखी 2 दिवस रुग्णालयात; राष्ट्रवादीच्या शिबिराबाबतही संभ्रम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -