घरताज्या घडामोडीGOA CM Pramod sawant : गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब,...

GOA CM Pramod sawant : गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब, विश्वजित राणेंनी ठेवला प्रस्ताव

Subscribe

गोव्याला पुढील पाच वर्षांसाठीचा मुख्यमंत्री मिळाला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागला. भाजपने गोव्यात आपली सत्ता राखली असून एकहाती सत्ता मिळवली होती. यानंतर गोव्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरु होती. मुख्यमंत्रीपदासाठी दोन नावे चर्चेत होते ती म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि विश्वजित राणे. विश्वजित राणे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु विश्वजित राणे यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाची प्रस्ताव ठेवला यावर सर्व नेत्यांनी आणि आमदारांचे एकमत झाले आहे. प्रमोद सावंत दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री होणार आहेत.

गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भाजप पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून संधी दिली आहे. गोव्यात विधानसभा निवडणुकीमध्ये प्रमोद सावंत यांना विश्वजित राणे यांच्यापेक्षा कमी मत मिळाली आहेत. तसेच विश्वजित राणे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. परंतु केंद्रीय पथक आणि स्थानिक नेत्यांच्या संगनमताने प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

- Advertisement -

विश्वजित राणे यांच्याकडून सावंतांच्या नावाचा प्रस्ताव

गोव्यात पुढील पाच वर्षांचा मुख्यमंत्री कोण असेल यासाठी भाजपची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय नेते देखील उपस्थित होते. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. विश्वजित राणे यांनी गोव्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. यावर चर्चा केल्यानंतर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आला.

मागील ५ वर्षात प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात उत्तम सरकार गोव्याला मिळाले. तसेच पुढील ५ वर्षात चांगले सरकार देण्यासाठी आणि उत्तम विकास करण्यासाठी प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच प्रमोद सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

- Advertisement -

हेही वाचा : नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -