Eco friendly bappa Competition
घर Assembly Battle 2022 Goa Election 2022 : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क, २२ पेक्षा...

Goa Election 2022 : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क, २२ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा विश्वास

Subscribe

उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या जागेसाठी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या. तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनीही मतदान केलं आहे. त्याचप्रमाणे भाजप २२ पेक्षा अधिक जागा जिंकेल, अशा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून मला शुभेच्छा दिला. मला पूर्व विश्वास आहे की, भाजप २२+ जागा जिंकेल. भाजपने १० वर्षात पायाभूत सुविधांचा विकास केला असून पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर दृष्टीचा आम्हाला १०० टक्के बहुमताचा नक्की फायदा होईल,असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी पणजीतील मतदान केंद्रांना भेट दिली. या मतदारसंघात उत्पल पर्रीकर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींचं आवाहन

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यासोबत आज उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व विधानसभा जागेसाठी मतदान आहे. सर्व मतदारांना माझी विनंती आहे की, लोकशाहीच्या या पवित्र उत्सवाचे भागीदार व्हा आणि मतदानाचा नवा रेकॉर्ड बनवा. त्यामुळे आधी मतदान, मग बाकी काम, हे लक्षात ठेवा, असे ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर सत्ताधारी भाजपसाठी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यावेळी सत्ताधारी भाजपची स्पर्धा आप , काँग्रेस आणि टीएमसी या पक्षांशी होणार आहे. गोव्यातील ४० जागांसाठी ३०१ उमेदवारांचे भवितव्य ११ लाख ६४ हजार ५२२ मतदारांच्या हाती आहे. उत्तराखंडमधील ७० जागांसाठी चुरशीची लढत होत आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये दुसर्‍या टप्प्यात ५५ जागांसाठी ५८६ मतदारांचे भवितव्य २कोटींहून अधिक मतदारांच्या हाती आहे.


हेही वाचा : Uttarakhand Election 2022: उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि आपच्या उमेदवारांमध्ये पेटला संघर्ष, व्हिडिओ व्हायरल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -