घरताज्या घडामोडीGoa Election : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून 24 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Goa Election : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून 24 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Subscribe

देशातील 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने 24 स्टार प्रचारकांची यादी आज बुधवारी 2 फेब्रुवारीला दिल्ली कार्यालयात जाहीर केली आहे. गोवा विधानसभा निवडणुकांसाठी जास्तीत जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करण्याचा सर्व पक्षांचा प्रयत्न आहे.

देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झालीय. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने 24 स्टार प्रचारकांची यादी आज बुधवारी 2 फेब्रुवारीला दिल्ली कार्यालयात जाहीर केली. गोवा विधानसभा निवडणुकांसाठी जास्तीत जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करण्याचा सर्व पक्षांचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगही निष्पक्ष मतदानासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांमध्ये पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा समोवेश केलेला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने 24 स्टार प्रचारक

  1. अध्यक्ष  शरद पवार
  2. ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार प्रफुल पटेल
  3. राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार सुनिल तटकरे
  4. खासदार सुप्रियाताई सुळे
  5. उपमुख्यमंत्री अजित पवार
  6. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
  7. प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील
  8. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
  9. मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते
  10. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक
  11. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
  12. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
  13. केरळचे वनमंत्री ए. के. ससिनद्रन
  14. राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा
  15. खासदार फौजिया खान
  16. युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा
  17. विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन
  18. अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही
  19. गोवा अध्यक्ष जोसे फिलीप डिसोजा
  20. डॉ. प्रफुल हेडे, अविनाश भोसले
  21. सतिश नारायणी (गोवा)
  22. केरळचे अध्यक्ष पी. सी. चोको
  23. केरळचे आमदार थॉमस के. थॉमस
  24. महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो

या स्टार प्रचारकांची यादी दिल्ली कार्यालयातून पक्षाचे राष्ट्रीय सचिव व कार्यकारिणी सदस्य एस. आर. कोहली यांनी प्रसिद्धीला दिली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Wine : सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीची परवानगी, शरद पवार म्हणतात विरोध फार चिंतेचा….


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -