गोव्यात २८ वर्षिय महिलेवर अल्पवयीन मुलाकडून बलात्कार

भारतात बलात्कारांच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. गोव्यामध्ये एका अल्पवयीन मुलाने २८ वर्षिय महिलेवर बलात्कार करून तिला ठार मारले आहे.

raped
महिलेवर बलात्कार

भारतात बलात्काराच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. दररोज १०६ बलात्कार होत असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणीच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यातही सामूहिक बलात्काराच्या आणि अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना वाढत आहेत. निर्भया प्रकरणानंतरही देशभरात बलात्काराच्या घटना सुरुच आहेत. यात घट तर नाहीच मात्र, वाढच होताना दिसत आहे. कायद्याचा धाकही नसल्याचं या घटनांमधून वारंवार समोर येत आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. गोव्यामध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने २८ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला ठार मारले आहे.

महिलेवर बलात्कार करून हत्या

महिलेवर बलात्कार आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली अल्पवयीन आरोपीला आणि गुन्ह्यात सामील असलेल्या आणखी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. १० फेब्रुवारीला पोर्वोरिमजवळील जंगलात महिलेचा विघटित मृतदेह सापडला होता. पीडित महिला मूळची ओडिशा येथील असून ती गोव्यामध्ये राहत होती. पोलिस उपअधीक्षक एडविन कोलाको यांनी सांगितले की, या प्रकरणात दोन आरोपींनी महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे पोस्टमॉर्टममधील अहवालाद्वारे समोर आले आहे. आरोपींवर कलम ३०२ खून, ३७६ बलात्कार आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.