घरCORONA UPDATEचिंता वाढली! गोव्यात कोरोनाचा पहिला बळी!

चिंता वाढली! गोव्यात कोरोनाचा पहिला बळी!

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या प्रभावात आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. गोव्यात सोमवारी सकाळी कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. मोरलेम येथील ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे निदान झाल्यापासून त्या महिलेवर रूग्णालयात उपचार सुरू होते, पण महिलेची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली अखेर महिलेचा मृत्यू झाला. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

- Advertisement -

या आधी गोवा कोरोनुक्त म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. मात्र लॉकडाऊन शिथील करताच झालेल्या स्थलांतरणामुळे पुन्हा गोव्याची डोकेदुखी वाढली. गोव्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढू लागली. आता गोव्यात पहिला कोरोनाचा बळी गेला आहे.

त्या महिलेला करोना झाल्याचे समजताच तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. पण मी गोव्यातील नागरिकांना खात्रीपूर्वक सांगतो की नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे”, अशी माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘त्या’ तीन साधूंनी महिलेवर एकदा नाही तर सलग सातवेळा केला बलात्कार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -