घरदेश-विदेशपाकिस्तान क्रिकेट संघाला गोव्यातील दुकानदाराचा पाठिंबा, लोकांनी दाखविला इंगा

पाकिस्तान क्रिकेट संघाला गोव्यातील दुकानदाराचा पाठिंबा, लोकांनी दाखविला इंगा

Subscribe

पणजी : या वर्षी होणार्‍या आशिया कप 2023चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. टीम इंडियाला या स्पर्धेसाठी पाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्यानंतर वादंग निर्माण झाले आहे. भारताच्या नकारानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नाराजी पसरली आहे. एकीकडे हा वाद सुरू असतानाच दुसरीकडे गोव्यात एका दुकानदाराने पाकिस्तान क्रिकेट टीमला दिलेला पाठिंबा महाग पडल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

गोव्यातील कलंगुट येथील एका दुकानदाराने पाकिस्तानी क्रिकेट संघाचे समर्थन केले होते. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला. हा व्हिडीओ एका ट्रॅव्हल ब्लॉगरने सोशल मीडियावर शेअर केला. त्यात दुकानाचा मालक पाकिस्तान क्रिकेट संघाला सपोर्ट करत असल्याचे सांगताना दिसत आहे. त्याला कारण विचारले असता, हा मुस्लीम भाग असल्याने पाकिस्तानला पाठिंबा देत असल्याचे त्याने सांगितले. ज्यावेळी हा व्हिडीओ शूट करण्यात आला त्यावेळी पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा सामना सुरू होता.

ब्लॉग काही काळ त्या व्यक्तीशी बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तो दुकानमालकाला विचारतो, “कोण खेळत आहे? तुम्ही न्यूझीलंडला प्रोत्साहन देत आहात का? तो माणूस उत्तर देतो, “पाकिस्तानला.” त्याला का म्हणून विचारल्यावर तो दुकानदार म्हणतो, “कारण हा मुस्लिम परिसर आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – “होय, मी गद्दारी केली, पण…” विरोधकांच्या आरोपावर गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी काही लोक या दुकानदाराकडे गेली आणि त्याला पाकिस्तानचे समर्थन करण्याबद्दल विचारणा केली. यानंतर त्यांनी दुकानदाराला केवळ माफी मागण्यास भाग पाडले नाही तर, ‘भारत माता की जय’च्या घोषणाही द्यायला सांगितल्या. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दुकानदार गुडघ्यावर बसून कान पकडून माफी मागताना दिसत आहे. पोलिसांनी देखील याबाबत कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगितले.

हेही वाचा – यावरून हेच सिद्ध होते…, उद्धव ठाकरे-केजरीवाल भेटीवरून नितेश राणेंची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -