घरताज्या घडामोडीGoa Tourism: आधी १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नंतर गोव्यात पर्यटन - प्रमोद...

Goa Tourism: आधी १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नंतर गोव्यात पर्यटन – प्रमोद सावंत

Subscribe

गोव्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोव्यातील कर्फ्यू २१ जून पर्यंत वाढवण्यात आला आहे.

राज्यातील रुग्णसंख्या कमी होत आली. निर्बंधांमध्ये देखील शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटनासाठी पर्यटकांची ओढा हा मोठ्या प्रमाणात गोव्याकडे असतो. प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून गोव्याला पसंती दिली जोते. मात्र गोव्यात पर्यटनासाठी जाण्यासाठी पर्यटकांना आणखी वाट पहावी लागणार आहे. राज्यातील प्रत्येक १८ वर्षांवरील व्यक्तीला कोरोना लस देण्यात येत नाही तोवर गोव्यात पर्यटन सुरु केले जाणार नाही, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद (Goa Cm Pramod Sawant) सावंत यांनी सांगितले आहे. (Goa Tourism: vaccination of citizens above 18 years, then tourism in Goa – Pramod Sawant) आधी १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नंतर गोव्यात पर्यटन, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. गोव्यातील १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीचा केवळ एक डोस तरी मिळत नाही तोवर गोव्यात पर्यटन सुरु करणार नाही. ३१ जुलैपर्यंत आम्हाला हे उद्दिष्ट साध्य करायचे आहे,असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा यांनी गोव्याचे पर्यटन सुरु करण्यासाठी सरकारकडे विचारणा केली असता पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांहून खाली येत नाही तोवर गोव्यातील पर्यटन क्षेत्र खुली केली जाणार असे सांगण्यात आले होते. मात्र आता गोव्यातील लसीकरण पूर्ण होत नाही तोवर गोव्यातील पर्यटन सुरु केले जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

गोव्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोव्यातील कर्फ्यू २१ जून पर्यंत वाढवण्यात आला आहे. गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहन अजगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, किनारपट्टीच्या सर्व लोकांचे लसीकरण पूर्ण केल्यावरच गोव्यातील पर्यटन सुरु झाले पाहिजे. गोव्याचे पर्यटन हे गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे गोव्यातील पर्यटन उद्योग आम्ही कायमचे बंद ठेवू शकत माही, असे गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहन अजगावकर यांनी सांगितले.

कोरोना महामारीमुळे गोव्यातील पर्यटन गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे गोव्यातील पर्यटन उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. या काळात गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. गोव्यातील पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांकडून गोव्यातील ही बंदी उठवण्याची मागणी तिथल्या व्यावसायिकांकडून केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोल्हापूरच्या व्यापार्‍याला नाशकात मिर्चीचा झटका

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -