घरताज्या घडामोडीतब्बल १०७ वर्षांपूर्वी चोरीला गेलेल्या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची काशीमध्ये प्राण प्रतिष्ठा

तब्बल १०७ वर्षांपूर्वी चोरीला गेलेल्या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची काशीमध्ये प्राण प्रतिष्ठा

Subscribe

तब्बल १०७ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून चोरीला गेलेली अन्नूपूर्णा देवीची मूर्ती कॅनडातून भारतात आणण्यात आली आहे. आज सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते काशी विश्वनाथ मंदिरात देवीच्या मूर्तीची मंत्रोच्चारांच्या घोषात प्राण प्रतिष्ठा करण्यात आली.

- Advertisement -

अन्नपूर्णा देवीची ही मूर्ती १५ ऑक्टोबरला कॅनडात सापडली होती. त्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे ही मूर्ती सुपूर्द करण्यात आली होती. नंतर उत्तर प्रदेश सरकारने ११ नोव्हेंबरला मूर्तीची विधीवत पूजा करत ती संबंधित विभागाकडून ताब्यात घेतली. सोमवारी वाराणसीत अन्नपूर्णेच्या या मूर्तीची भक्तीमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्याआधी कासगंज, कानपूर,अयोध्येसह अनेक ठिकाणी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची जल्लोषात चार दिवसीय शोभा यात्रा काढण्यात आली होती.

यावेळी देवीला लाल रंगाचा लेहेंगा चढवण्यात आला होता. ही शोभायात्रा दिल्लीपासून काशी विश्वनाथ मंदिरापर्यंत ८०० किलोमीटरपर्यंत काढण्यात आली होती. एका भव्य लाकडी सिंहासनावर आरुढ झालेल्या अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेण्यासाठी यावेळी शेकडो भक्तांनी गर्दी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -