(Gold and cash in the car) भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमधील जंगलात अलीकडेच एक बेवारस कार सापडली होती. त्यामध्ये कोट्यवधींची रोकड आणि सोने सापडले होते. आता ईडीनेही यात एन्ट्री घेतली असून या प्रकरणी मुख्य आरोपी सौरभ शर्मा आणि त्याचा मित्र चेतन गौर यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने सोन्याच्या बिस्किटांचा स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. (Saurabh Sharma has been booked by the ED in the case of the car found in the forest)
प्राप्तिकर विभाग आणि लोकायुक्तांच्या कारवाईपाठोपाठ आता सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) या प्रकरणात एन्ट्री घेतल्याने भोपाळमधील परिवहन विभागाचा (आरटीओ) माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्मा याच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. सौरभ शर्माच्या घरावर छापेमारीदरम्यान एका कारमधून कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोकड जप्त करण्यात आले होते. आतापर्यंत 10 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एक डायरीही समोर आली आहे, ज्यामध्ये दरवर्षी करण्यात आलेल्या सुमारे 100 कोटी रुपयांच्या हेराफेरीचा तपशील त्यात असल्याचे सांगितले जात आहे. मुख्य आरोपी सौरभ शर्मा हा अद्याप फरार आहे. सौरभचे ई-7, अरेरा कॉलनी, भोपाळ येथे कार्यालय होते, या कार्यालयातील गाडी रोख रक्कम आणि सोन्यासह जप्त करण्यात आली आहे.
हेही वाचा – Chhagan Bhujbal : 8 ते 10 दिवसांत…; भेटीनंतर भुजबळांना फडणवीसांचे हे आश्वासन
सौरभ शर्मा दुबईत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. या प्रकरणात त्याचा साथीदार चेतनसिंग गौरचाही सहभाग होता. त्याच्याशी सबंधित ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले आहेत. लोकायुक्तांच्या विशेष पोलीस आस्थापनेने (SPE) सौरभ शर्मा याच्या घरावर आणि कार्यालयावर 19-20 डिसेंबर रोजी छापा टाकला होता. त्याच दिवशी करण्यात आलेल्या एका वेगळ्या कारवाईत, प्राप्तिकर विभागाने गौरशी निगडीत एका बेवारस गाडीतून सुमारे 54 किलो सोन्याची बिस्किटे आणि सुमारे 10 कोटी रुपये रोख जप्त केले होते. (Gold and cash in the car: Saurabh Sharma has been booked by the ED in the case of the car found in the forest)
हेही वाचा – SS UBT Vs BJP : मोदी-शहा-फडणवीसांनी न्याय अधिकारांची नाकाबंदी केली, ठाकरे गटाचा घणाघात