घरताज्या घडामोडीसोन्याची झळाळी ओसरली, चांदीलाही कमी भाव

सोन्याची झळाळी ओसरली, चांदीलाही कमी भाव

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठ्याप्रमाणात घसरण होत आहे. त्यामुळे तुम्हीही सोने खरेदी करण्याची विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आज कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव पुन्हा ३७० रुपयांनी खाली आला आहेत. सराफा बाजारामध्ये सोन्याचा आजचा भाव ४४ हजारांखाली घसरला आहे. गोल्ड रिटन्स या वेबसाईटनुसार आज मुंबई २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३९०० रुपयांवर पोहचला आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४४९०० रुपयांवर येऊन स्थिरावला. दिल्लीत सोन्याचा भाव हा ४३९५० रुपये इतका झाला आहे. त्यामुळे बुधवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात ४७० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे दर दिवसेंदिवस घसरत असल्याने सामान्यांनाही सोने परवडणारे झाले आहे. सोन्याप्रमाणेच चांदीही स्वस्त झाली आहे. एक किलो चांदीची किंमत (Silver Price)६६८८५ रुपये झाली. त्यामुळे चांदीच्या भावात १११५ रुपयांची घसरण झाली आहे. (gold prices continue to fall )

जागतिक पातळीवर भांडवली बाजारात तेजी पाहयला मिळाली. त्याशिवाय डाॅलरचे भावही वधारत आहे. परिणामी सोन्यावरील दबाव वाढला आहे. आज जागतिक बाजारात सोन्याचा भाव १७११ डॉलर प्रती औंस होता. चांदीमध्ये मात्र तेजी दिसून आली. चांदीचा भाव ०.४ वधारून २६.१८ डॉलर प्रती औंस झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा- सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -