घरदेश-विदेशToday Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, जाणून घ्या आजचा...

Today Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, जाणून घ्या आजचा दर

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत घसरण होत आहे. यातच भारतीय बाजारमध्ये मागणी घटल्यामुळे मंगळवारी सोन्याचे दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. Good Return वेबसाईटनुसार आज मंगळवारी (२३ मार्च) २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याच्या दरात १२ रुपयांची घट झाली आहे. यामुळे आज सोन्याचे प्रति १० ग्रॅमचे दर ४३ हजार ८०० रुपयांवर पोहचला आहे. सोमवारी हे दर ४३ हजार ९२० रुपयांवर पोहचले होते.तर २४ कॅरेट सोन्याचे प्रति १० ग्रॅम दरात १२० रुपयांनी खाली आले. यामुळे आज २४ कॅरेट सोन्याचे दर ४४ हजार ८०० रुपये झाला आहे. हेच दर सोमवारी ४४ हजार ९२० रुपयांवर पोहचले होते.

आज मंगळवारी मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर ४४ हजार ८०० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४३ हजार ८०० रुपये इतका खाली आला आहे. तर दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ४८ हजार २२० झाला असून २२ कॅरेट सोन्याचा दर ४४ हजार २०० रुपये झाला आहे. तसेच चेन्नईत २४ कॅरेट सोन्याचा दर ४५ हजार ९५० वर पोहचला आहे, तर २२ कॅरेट सोन्यासाठी चेन्नईत ४२ हजार १२० रुपये मोजावे लागणार आहे. याचबरोबर कोलकत्तामध्ये २४ कॅरेट सोन्याचे दर ४७ हजार २१० रुपये झाला असून २२ कॅरेटचे दर ४४ हजार ५४० रुपये आहे.

- Advertisement -

त्यामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याचा रेकॉर्ड ब्रेक दर २१ टक्क्यांनी कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोन्याचे दरात अशीच पडझड सुरु आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली होती. प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ५६ हजार २०० रुपयांवर पोहचला होता. परंतु २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यापासून सोन्याचे दर सतत घसरत आहे. सतत होणाऱ्या घसरणीमुळे सोने तब्बल ११,००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.


हेही वाचा- Today Gold Rate: सोन्याचे भाव पुन्हा गडगडले, चांदी सर्वाधिक स्वस्त

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -