घरताज्या घडामोडीGold-Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Subscribe

भारतात दागिन्यांच्या खरेदीची एक वेगळीच क्रेझ आहे. सणासुदीच्या वेळी दागिन्यांची मागणी अजून वाढते. यामुळे भारतीय सराफ बाजारात सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार दिसत असते. या आठवड्यात चौथ्या दिवशी आज गुरुवारी गेल्या दिवसाच्या तुलनेत सोन्याचे दर ४१६ रुपयांनी तर चांदीचे दर ५४९ रुपयांनी घटले आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएनच्या (India Bullion And Jewellers Association) माहितीनुसार, आज सकाळी ९९९ शुद्धतेचे २४ कॅरेटचे सोन्याचे दर घसरून ४६ हजार ८३९ रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. तर चांदीचे दर ६२ हजार ५३१ रुपये प्रति किलो झाले.

                                      शुद्धता          बुधवारचे दर           गुरुवारचे दर
सोना (प्रति १० ग्राम)           ९९९             ४७,२५५                ४६,८३९
सोना (प्रति १० ग्राम)           ९९५             ४७,०६६                ४६,६५१
सोना (प्रति १० ग्राम)           ९१६             ४३,२८५                 ४२,९०५
सोना (प्रति १० ग्राम)           ७५०             ३५,४४१                 ३५,१२९
सोना (प्रति १० ग्राम)           ५८५             २७,६४४                २७,४०१
चांदी (प्रति १ किलो)           ९९९             ६३,०८१                 ६२,५३२

- Advertisement -

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची

सर्वात शुद्ध सोनं २४ कॅरेटचं असतं. परंतु २४ कॅरेट सोन्याचे दागिने होत नाहीत. सामान्यतः २२ कॅरेट सोनं जास्त करून दागिन्यांसाठी वापरले जाते. यामध्ये ९१.६६ टक्के सोनं असतं. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिणे घेत असाल तर तुम्हाला समजले पाहिजे की, यामध्ये २२ कॅरेट सोन्यासोबत २ कॅरेट कोणतेही मेटल मिस्क केले आहे. दागिन्यांमध्ये सोन्याच्या शुद्धेबाबत हॉलमार्क संदर्भात ५ प्रकारचे निशाण असतात. हे निशाण दागिन्यांमध्येही असतात. जर २२ कॅरेटचे सोनं असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेटीच्या दागिन्यांवर ८७५ आणि १८ कॅरेटच्या दागिन्यांवर ७५० लिहिलेले असते. तसेच जर दागिने १४ कॅरेटचे असतील तर त्यावर ६८५ लिहिलेले असते.

- Advertisement -

हेही वाचा – Air India खरेदी करण्यासाठी Tata Sonsने लावली बोली; शेवटच्या टप्प्यात पोहोचली गुंतवणुकीची प्रक्रिया


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -