घरताज्या घडामोडीGold Investment: घरातल्या सोन्यावर दुप्पट नफा मिळवण्याची संधी; SBI ची स्किम तर...

Gold Investment: घरातल्या सोन्यावर दुप्पट नफा मिळवण्याची संधी; SBI ची स्किम तर बघा

Subscribe

भारतीय नागरिकांना सोन्याची झळाळी नेहमीच आकर्षित करत आलेली आहे. सोनं विकत घेणे आणि गुंतवणूक करणे, यात भारतीय नेहमीच पुढे असतात. लॉकडाऊनमध्ये आर्थिक मरगळ आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी सोने गुंतवणुकीचा एक पर्याय समोर आलेला आहे. बरेच जण सोन्याचे दागिणे घरातच ठेवणे पसंत करतात. पण खूप कमी लोकांना माहीत आहे की, जर सोने बँकेत ठेवले तर त्यावर अनेक फायदे मिळतात. केंद्र सरकारनेही वारंवार सोने बँकेत ठेवल्यास ते सुरक्षित आणि नफा देणारे ठरेल असे सांगितले आहे. आता तुम्ही SBI Gold Investment करुन सोन्यावर अधिकचा नफा मिळवू शकता. बघा काय आहे ही स्किम

देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने गोल्ड डिपॉझिट स्कीम (Gold deposit scheme) सुरु केली आहे. यामध्ये दोन मोठे फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे सोने बँकेत सुरक्षित राहिल. दुसरे म्हणजे यावर तुम्हाला पैसे देखील मिळून शकतात. साधारण पणे सोने बँकेत ठेवल्यानंतर आपल्याला वाटतं की ते तिथं पडून राहणार आहे. पण असे नाही.

- Advertisement -

स्कीम काय आहे?

SBI च्या रिवॅम्प्ड गोल्ड डिपॉजिट स्कीम (R-GDS) च्या माध्यमातून सोन्यावर नफा मिळवता येतो. बँकेत ठेवलेल्या सोन्यावर व्याज मिळते. या स्कीमला काही नियम देखील आहेत. या स्कीमचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी ३० ग्रॅम सोने बँकेत ठेवावे लागेल. तसेच बँकेत सोने ठेवण्याचा कालावधी किती असावा, याची काही सीमा नाही. तसेच वैयक्तिकरित्या किंवा संयुक्त खात्याद्वारे सोने बँकेत ठेवले जाऊ शकते.

या स्किममध्ये तीन पर्याय दिलेले आहेत.

शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट – कालावधी १ ते ३ वर्ष
मीडियम टर्म गव्हर्नमेंट डिपॉझिट – कालावधी ५ ते ७ वर्ष
लाँग टर्म गव्हर्नमेंट डिपॉझिट – कालावधी १२ ते १५ वर्ष

- Advertisement -

व्याजदर किती?

शॉर्ट टर्म बँक डिपॉझिटसाठी १ ते २ वर्ष सोने ठेवल्यास ०.५५ टक्के आणि २ ते ३ वर्षांसाठी ०.६० टक्के व्याज मिळेल. मीडियम टर्म गव्हर्नमेंट डिपॉझिटमध्ये २.२५ टक्के व्याज मिळेल. तर लाँग टर्म गव्हर्नमेंट डिपॉझिट मध्ये सोने ठेवल्यास २.५० टक्के व्याज ऑफर केले जात आहे.

स्कीममध्ये सोने ठेवण्यासाठी काय करायचं?

तुमच्या जवळ असलेल्या SBI शाखेत जाऊन तुम्ही या स्कीमची चौकशी करु शकता. तिथे तुम्हाला अधिक माहिती मिळेल. खातेदाराला आपली KYC प्रक्रिया पुर्ण करावी लागेल. त्यानंतर या स्कीमचा अर्ज भरून वरील तीन पैकी एका कालावधीसाठी तुम्ही सोने बँकेत जमा करु शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -