सोन्यातील गुंतवणुकीमुळे किंमत वाढण्याची शक्यता? जाणून घ्या आजचा भाव

gold silver price today 24 january 2023 gold silver price today in delhi mumbai chennai kolkata jaipur lucknow and other cities

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होताना दिसत आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळच्या सत्रात कोणतीही हालचाल न दिसल्यामुळे शेअर बाजारापासून बँकिंग सेक्टरपर्यंत अस्थिर वातावरण दिसत असल्यामुळे गुंतवणूकदार सध्या सोन्याकडे वळताना दिसत आहेत.

सोने गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित मानले जात असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. केंद्रीय बँकांनी पण सोन्यात गुंतवणूक वाढवल्यामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी उसळी दिसून येताना चांदीही चमकली आहे. यापूर्वीचे रेकॉर्ड तोडण्यासाठी चांदीच्या किंमतीतही वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ही परिस्थिती कायम राहिल्यास सोने आणि चांदीच्या किंमती नवीन विक्रम करतील.

सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ 
गुरुवारी रामनवमीनिमित्त सराफा बाजारातील किंमतीत कोणतीही हाचलाच दिसली नाही. आयबीजीएने काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 24 कॅरेट सोन्याची किंमत सकाळी 59,106 रुपये, तर संध्याकाळी ही किंमत 59,335 रुपये होती. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत सकाळी 58,869 रुपये, तर संध्याकाळी 59,097 रुपये होती. बुधवारी सोने 370 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढल्यामुळे सोन्याची किंमत 59335 रुपये प्रति तोळा होता आणि मंगळवारी सोने 58965 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. सोने सातत्याने विक्रम करत असल्यामुळे सोन्याचा दर लवकरच 61,000 रुपयांचा टप्पा गाठू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे.

चांदी पण विक्रम करणार
सोन्याप्रमाणेस चांदीच्या किंमतीतही सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीचा दर सातत्याने वाढत आहे. एक किलो चांदी 73000 रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे चांदीच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. गुरुवारी चांदीचा दर 73000 रुपये होता, तर आज दर 73300 रुपये प्रति किलो आहे. 2 फेब्रुवारी रोजी चांदीने 74,700 रुपये एवढी किंमतीने विक्रम केला होता. हा विक्रम लवकरच मोडेल अशी शक्यता आहे.

सोने खरेदीसाठी नवीन हॉलमार्क अनिवार्य
ग्राहक मंत्रालयाने शुक्रवारी सोन्याच्या खरेदी विक्रीसाठी नियमात बदल केला आहे. या नियमानुसार उद्यापासून (1 एप्रिल) हॉलमार्क क्रमांकाशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही. नवीन नियमानुसार उद्यापासून चार अंकी हॉलमार्क युनिक ऑयडेंटिफिकेशनशिवाय (HUID) आभुषणे आणि दागिने खरेदी-विक्री करता येणार नाही. 1 एप्रिलपासून सहा आकडी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग दागिन्याची खरेदी-विक्री मान्य राहील.