Gold Jewellery Hallmarking: सोन्याच्या दागिन्यांवर १ जूनपासून हॉलमार्किंग बंधनकारक

सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंसाठी येत्या १ जून २०२१ पासून हॉलमार्क बंधकारक करण्यात आले आहे.

gold
सोन्याचे दागिने

सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंसाठी येत्या १ जून २०२१ पासून हॉलमार्क बंधकारक करण्यात आले आहे. यापूर्वी सरकारने १५ जानेवारी २०२१ पासून सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक केले होते. मात्र, दागिन्यांच्या हॉलमार्किंगची तयारी करण्यासाठी आणि भारतीय मानक ब्युरोमध्ये नोंदणी करण्यासाठी एका वर्षापेक्षा जास्त कालावधी देखील देण्यात आला होता. मात्र, कोरोनामुळे सराफ व्यापाऱ्यांनी मुदत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता येत्या १ जूनपर्यंत वाढ करुन देण्यात आली असून त्यानंतर हॉलमार्क बंधकारक असणार आहे.

नोंदणीचा आकडा वाढण्याची शक्यता

नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन आणि स्वयंचलित करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दीड महिन्यात नोंदणीचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच १ जूनपासून सराफ व्यापाऱ्यांना केवळ १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दागिने विक्री करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

ग्राहकांना शुद्ध सोनं मिळणार

बीआयएसनुसार, हॉलमार्किंग सक्तीचे केल्यामुळे ग्राहकांना प्रमाणित शुद्धतेचे दागिने मिळणार आहेत. त्यामुळे आता ग्राहकांची फसवणूक होणार नाही.

नियम पाळा नाहीतर होणार शिक्षा

देशभरात २३४ जिल्ह्यांमध्ये ८९२ हॉलमार्किंग केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या हॉलमार्किंगचा नियम पाळला नाही १ वर्षाचा तुरुंगवास आणि दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे. मात्र, ग्रामीण भागातल्या सराफांना यातून सूट देण्यात आली आहे. तिथे अजून हॉलमार्किंगची केंद्र व्हायची आहेत. त्यासाठी अजून १ वर्ष लागेल, अशी माहिती समोर आली आहे.