Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठ्याप्रमाणात घसरण होत आहे. त्यामुळे तुम्हीही सोने खरेदी करण्याची विचार करत असाल तर तुमच्यासाठी सध्या सुवर्ण संधी आहे. गेल्या दोन आठवड्यापासून सोन्याचे दर ४७,००० रुपयांच्या जवळपास होते मात्र आज ते ४५,००० च्या खाली आले आहे. त्यामुळे आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर एप्रिलच्या वायदा सोन्याचे दर ०.५४ टक्क्यांनी घसरले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स)च्या माहितीनुसार, सोन्याच्या भाव २४४ रुपयांची घसरण होऊन ४५,०७० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी झाली आहे. त्यामुळेगेल्या दोन दिवसांपासून सोने ६०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्या आठवड्याच्या सोमवारी एमसीएक्सवरील सोन्याचा एप्रिल वायदा भाव ४६९०१ रुपयांवर बंद झाला. तर शुक्रवारी प्रति १० ग्रॅम सोने ४७,७३६ रुपयांवर बंद झाले. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यात प्रति १० ग्रॅम सोने ११६५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे आज सोन्याचे दर ४५ हजार रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.

तर चांदीचा भावातही आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मोठ्याप्रमाणात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर मे 2021 च्या वायद्यानुसार चांदीची दर आज 975 रुपये म्हणजे 1.42 टक्क्यांनी घसरून 67,825 रुपये प्रति किलोवर आले. त्यामुळे गेल्या सत्रात मेच्या कराराची चांदीची किंमत 68,800 रुपये प्रति किलो होती. त्याचप्रमाणे जुलै २०२१ मध्ये डिलिव्हरी चांदी 1,333 रुपये म्हणजे 1.90 टक्यांच्या घटीसह 68,818 रुपये प्रतिकिलो पातळीवर घसरली. मागील सत्रात जुलै करारासाठी चांदीचा दर प्रति किलो 70,151 रुपये होता. ‘गुड रिटर्न्स’ या वेबसाईटच्या माहितीनुसार, आज २२ कॅरेट सोन्याचा मुंबईतील भाव ४४,९६० रुपये इतका आहे. दिल्लीत ४५,२१० रु, कोलकाता ४५,४७० रु, पुण्यात ४४,९५० रुपये इतका आहे तर चेन्नईत ४३,४२० रुपयावर पोहचला आहे.  २४ कॅरेट सोन्याचे दर मुंबई आणि पुण्यात ४५,९५० रुपये, कोलकातामध्ये ४८,३५० रु, दिल्लीत ४९,३१० रु, चेन्नईत ४७,३७० रु आणि अहमदाबादमध्ये ४७,५६० रुपये इतका आहे.


हेही वाचा- यामुळे कोहळा, आवळा आणि सगळेच भस्म होईल; शिवसेनेने मोदी सरकारला सुनावले

- Advertisement -

 

- Advertisement -