घरताज्या घडामोडीखुशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

खुशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Subscribe

मंगळवारी रशियाने कोरोना लस विकसित झाल्याचा दावा करताच आंतरराष्ट्रीय बाजार गडगडण्यास सुरुवात झाली. यामुळे आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कोरोनाच्या संकटात कधी सोन्याचे दर वाढत होते तर कधी घसरत आहेत. आज सोन्याच्या दरात ४ हजार तर चांदीच्या दरात तब्बल १२ हजार रुपयांची घसरण झाली आहे. कोरोनाच्या लसीची घोषणा होताच सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून सोन्याची किंमत ५१ हजार ७०० रुपयांवर आली आहे. तर चांदीची किंमत ६३ हजार ५०० रुपयांवर घसरली आहे.

कोरोनाच्या संकट काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीत मोठी गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळे याचे परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर झाले होते. पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कोरोना लस विकसित झाल्याचा दावा केल्यानंतर सट्टा बाजारात खरेदीदारांनी वाढविलेली खरेदी थांबवली आणि विक्रीचा मारा सुरू केला. म्हणून मंगळवारी ५५ हजार ७०० रुपये असलेल्या सोन्याच्या दरात ४ हजार रुपयांची घसरण होऊन आज त्यांची किंमत ५१ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आली आहे. तर मंगळवारी असलेल्या ७५ हजार ५०० रुपये चांदीच्या दरात तब्बल १२ हजार रुपयांची घसरण होऊन आज ६३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकाऱ्यांसह पाच तहसीलदारांच्या बदल्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -