घरCORONA UPDATEखुशखबर! सोनं स्वस्त झालं, आजचा मुंबईतील भाव 'इथे' वाचा!

खुशखबर! सोनं स्वस्त झालं, आजचा मुंबईतील भाव ‘इथे’ वाचा!

Subscribe

एकीकडे देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे मात्र आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. कमॉडीटी बाजारात झालेल्या नफेखोरीने सोन्याचं दरातील घसरण कायम राहिली आहे. सोने १०० रुपयांनी स्वस्त होऊन ४७२५० रुपये झाले. चांदीच्या दरात ५० रुपयांची घट झाली. चांदीचा भाव किलोला ४८५०० रुपये झाला आहे. गेल्या आठवड्यात सोने जवळपास २००० रुपयांनी महागले होते.

सोन्याचा दर १० ग्रॅमला ३४२ रुपयांनी कमी होऊन ४७०७२ रुपये झाला होता. चांदीच्या दरात ७५२ रुपयांची घट झाली आणि भाव ४७८८७ रुपये झाला. सध्या जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रती १७२७.२४ डॉलर झाला आहे. त्यात ०.४ टक्क्याची घसरण झाली. चांदीचा भाव १७.६४ डॉलर असून त्यात ०.४ टक्क्याची घसरण नोंदवण्यात आली.

- Advertisement -

मुंबईत भाव घसरला

मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५४१० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६०६० रुपये झाला आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७२६० रुपये झाला आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२६० रुपये झाला असून २४ कॅरेटसाठी ४७७६० रुपये आहे. चेन्नईतील सोन्याचा दर २२ कॅरेटसाठी ४५२८० रुपये असून २४ कॅरेटसाठी प्रती १० ग्रॅम सोने दर ४९५१० रुपये झाला आहे.


हे ही वाचा – पुन्हा पेट्रोल- डिझेलच्या भावात वाढ, ‘हा’ आहे आजचा भाव!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -