घरदेश-विदेशtoday gold rate: सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, चांदीची चमक वाढतेयचं

today gold rate: सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, चांदीची चमक वाढतेयचं

Subscribe

कमॉडिटी बाजारात सोन्याचा दर १४२ रुपयांनी वाढले

देशात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असली तर कोरोना रुग्ण संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देश परत लॉकडाऊन होतो की काय असे संकट निर्माण झाले आहे. याचाच परिणाम आज सोन्याच्या दरावरही दिसून आला. कमॉडीटी बाजारात आज सोने दरात तेजी दिसून आली. आज मंगळवारी कमॉडिटी बाजारात सोन्याचा दर १४२ रुपयांनी वाढले आहे. अनेक गुंतवणुक दरांनी आर्थिक स्थिती ढासळत असल्याने सोने खरेदीला पुन्हा पसंती दिली आहे. त्यामुळे सोन्याचे दर पुन्हा वाढतायंत की काय अशी चिंता निर्माण झाली आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजनुसार, प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४४३५० रुपयांवर पोहचला आहे. यापूर्वी सोन्याचा भाव ४४३८७ रुपयांवर पोहचला होता. त्यामुळे सोने भावात आज १३२ रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी कमॉडिटी बाजार बंद होताना सोन्याच्या दरात ४६७ रुपयांची घसरण पाहयला मिळाली. तर चांदीच्या भावात २०३ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव ६६०५५ रुपयांवर पोहचला होता. तर आज चांदीने ६६२७२ रुपयांवर मजल मारली आहे. त्यामुळे चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

गोल्ड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३६९० रुपयांवर पोहचला आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४४६९० रुपयांवर स्थिरावला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४१६० रुपये आहे तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८१७० रुपयांवर पोहचला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४२२२० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४६०६० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४१३० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६७७० रुपये आहे.

- Advertisement -

हेही वाचा- मराठा आरक्षण : इतर राज्यांना सुप्रीम कोर्ट नोटीस पाठवणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -