Gold Price : सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी मोजावे लागणार आता…

Gold Price Today: Gold Rates plunges rs 810 sliver cracks rs 1548 Should You Buy Gold Today?
Gold Price : सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी मोजावे लागणार आता...

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याने दिल्ली सराफा बाजारातही मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याचा दर ८१० रुपयांची घसरल्याने प्रति १० ग्रॅम सोने ४६,८९६ रुपये झाले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. मागील सत्रात सोन्याचा व्यवहार ४७,७०६ रुपये प्रति १० ग्रॅमने बंद झाले. सोन्याप्रमाणेच चांदीचे दरही १५४८ रुपयांनी घसरून ६२४,७२० रुपये प्रति किलोवर बंद झाला. मागील सत्रात चांदीचा दर ६४,२६८ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव अनुक्रमे १८०६ प्रति औंस आणि २४.०५ प्रति औंसवर स्थिर राहिले. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, मंगळवारी कॉमेक्सवर सोन्याच्या किमतीत घट झाल्यामुळे दिल्लीतील २४ कॅरेट सोन्याचे दर ८१० रुपयांनी घसरले आहेत.

सोन्याच्या वायदे बाजारातही घसरण

वायदे बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव १०६ रुपयांनी घसरून ४७,८१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव १०६ रुपये अर्थात ०.२२ टक्क्यांनी घसरून ४७,८१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्यात ४८४४ लॉटची उलाढाल झाली.

चांदीचे भाव घसरले

वायदे बाजारात मंगळवारी चांदीचा भाव ६३२ रुपयांनी घसरून ६३,९३२ रुपये प्रति किलोवर आला.