Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Gold Price Today on 21st July : चार दिवसांनंतर सोन्याला पुन्हा झळाळी,...

Gold Price Today on 21st July : चार दिवसांनंतर सोन्याला पुन्हा झळाळी, चांदीच्या दरातील घट कायम

Related Story

- Advertisement -

सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असून अमेरिकेच्या ट्रेझरी उत्पादनातील घट यामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सोन्याचे भाव जरी वाढले तरी चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक बाजारात सोन्याचा भाव 253 रुपयांनी वाढून 47 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. त्याचबरोबर चांदीचा दर 61 रुपयांनी घसरून 65 हजार 730 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. गेल्या चार दिवसांपासून घसरणाऱ्या सोन्याच्या किंमती वाढ आज वाढ झाल्याने 260 रुपयांनी ही वाढ झाली आहे. आज मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात एक तोळा सोन्याचा भाव हा 48 हजार 300 (24 कॅरेट) रुपये इतका आहे तर सोन्याचा भाव हा 47 हजार 300 (22 कॅरेट) रुपये इतका झाला आहे. चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी ही घट झाली असून आज त्यामध्ये 300 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आज एक किलो चांदीचे दर हा 67 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे.

मागील सत्र संपेपर्यंत सोन्याच्या वायद्याची किंमत खाली घसरली आहे. स्थानिक फ्युचर्स मार्केटमध्ये मंगळवारी सोन्याचे भाव 46 रुपयांनी घसरून 48 हजार 048 रुपयांवर पोहोचला आहे. एमसीएक्सवर ऑगस्टमध्ये डिलीव्हरीसाठीचे सोन्याचे भाव 46 रुपयांनी म्हणजेच 0.1 टक्क्यांनी घसरून 48 हजार 048 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत GoldPrice.org नुसार आज सकाळी सोनं एमसीएक्सवर 0.21 टक्क्यांनी घसरत आहेत आणि धातू प्रति औंस 1807.65 च्या पातळीवर आहे. तर चांदी 1.15 टक्क्यांनी घसरली असून चांदी 24.88 औंस डॉलर प्रति औंसच्या पातळीवर आली आहे.

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत

- Advertisement -

(या किंमती प्रति 10 ग्रॅम सोन्याचे आहेत.)

Good Returns वेबसाइटनुसार, आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 ग्रॅमसाठी ​​4 हजार 831, 8 ग्रॅमसाठी ​​38 हजार 648, 10 ग्रॅमसाठी ​​48 हजार 310 आणि 100 ग्रॅमसाठी ​​4 लाख 83 हजार 100 रूपये अशी आहे. तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची विक्री 47 हजार 310 रूपयांवर होत आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,410 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,720 आहे. मुंबईत 22 कॅरेट सोनं 47,310 आणि 24 कॅरेट सोनं 48,310 च्या दराने विक्री केली जात आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर हा 47,710 रुपये, तर 24 कॅरेटचे सोन्याचा दर हा 50,210 रुपये आहे. चेन्नईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 45,670 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 49,820 रुपये आहे.

- Advertisement -