Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Today Gold Price: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण; जाणून घ्या आजचा...

Today Gold Price: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण; जाणून घ्या आजचा दर

एकेकाळी सोन्याचा भाव वाढून सोन्याला अचानक झळाली मिळाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी देशात सोन्याच्या किंमतीत सतत घसरण

Related Story

- Advertisement -

एकेकाळी सोन्याचा भाव वाढून सोन्याला अचानक झळाली मिळाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी देशात सोन्याच्या किंमतीत सतत घसरण झाल्याचे पाहायला मिळाली. मात्र २०२१ या वर्षाची सुरुवात सोन्यासाठी खूप वाईट होती. या वर्षात जानेवारीपासून सराफा बाजारात सोन्याचे दर १० ग्रॅम ५,५४७ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. लग्नसराईच्या हंगामात यापूर्वी कधीही सोनं खरेदी करण्याची चांगली संधी सामान्यांसाठी नव्हती. गेल्या आठवड्यातही २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅम २८२ रुपयांनी घसरले होते, तर चांदीच्या किंमतीत २ हजार १५७ रुपयांची घसरण झाली होती.

मार्च महिन्याबद्दल सांगायचे तर सोन्याची आतापर्यंत १,३२१ आणि चांदीची किंमत ३,८०८ रुपयांनी कमी होऊन सराफा बाजाराचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत सर्वाधिक भाव हा ७ ऑगस्ट २०२० च्या तुलनेत सोन्याचा भाव ११ हजार ४७१ रुपयांनी आणि चांदी ११ हजार ३५० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

- Advertisement -

गुड रिटर्न (good return) वेबसाईटनुसार, आज सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर ४२९९० रुपयांखाली आला आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४३९९० रुपये झाला आहे. पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा दर ४२९९० रुपये झाला आहे तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४३९९० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४०६० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४८०६० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४१९० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६९१० रुपये आहे. नाशकात २२ कॅरेटसाठी ४२९९० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४३९९० रुपये आहे.

देशात कोरोना लसीकरण मोहिमेला वेग आल्याने २०२० मध्ये ५६ हजारांचा टप्पा गाठणाऱ्या सोन्याचे दर मार्च २०२१ मध्ये घसरताना दिसताय. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढत आहे. अशा परिस्थितीत जर इक्विटी बाजार कोसळलं तर सोन्याच्या किंमती वेगाने वाढतील. कमी दरामुळे कमी सध्या सोन्याची खरेदी वाढत आहे. त्यामुळे सोन्याचा दर पुन्हा वाढण्याची शक्यता असू शकते. जर भाव पुन्हा एकदा वाढले तर प्रति १० ग्रॅम सोनं ४६,५०० रुपयांपर्यंत जाऊ शकते.

- Advertisement -

 

- Advertisement -