घरताज्या घडामोडीGold Silver Price: सोन्याच्या किंमतीत झाली वाढ, चांदीच्या दरात घसरण

Gold Silver Price: सोन्याच्या किंमतीत झाली वाढ, चांदीच्या दरात घसरण

Subscribe

कोरोना लसीसंदर्भातील पॉझिटिव्ह बातमीचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाला.

या आठवड्यात कोरोना व्हायरसची लसीसंदर्भात येणाऱ्या सकारात्मक बातम्यामुळे सोने आणि चांदीच्या दरावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आज भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याची किंमत ०.१५ टक्क्यांनी वाढून ४९ हजार २७१वर प्रति १० ग्रॅम झाली आहेत. तर चांदीच्या किंमतीत ०२ टक्क्यांची घसरण होऊन ६३ हजार ६८४वर प्रति किलोग्रॅम झाली आहे.

गेल्या सत्रात सोन्याची किंमतीत ०.२ टक्क्यांची घसरण होऊन ४९ हजार २०९ रुपये प्रति १० ग्रॅम किंमत होती. तसेच चांदीची किंमत ०.३ टक्क्यांनी वाढली होती. ऑगस्ट महिन्यात भारतात सोन्याची किंमत सर्वाधिक ५६ हजार २०० झाली होती. सध्याची सोन्याची किंमत ७ हजार रुपयांनी कमी झाली आहे. सोन्याचे व्यापारी या आठवड्याच्या शेवटी युरोपियन सेंट्रल बँक निधी संबंधातील निर्णयावर परिणामाची प्रतीक्षेत आहेत.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत १,८३७ डॉलर प्रति औंस झाली आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटेन फायझर आणि बायोटेकची (Pfizer/BioNTech) कोरोना लस देणारा पहिला देश ठरला आहे. याशिवाय या आठवड्याच्या शेवटी अमेरिकेच अन्न व औषध प्रशासन कोरोना लसीसंदर्भात चर्चा करतील. त्यामुळे कोरोना लसीसंदर्भात सकारात्मक येणाऱ्या माहितीमुळे सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम होत आहे.

मुंबईतील सोन्या-चांदीचे दर

आज मुंबईतील २२ कॅरटचा सोन्याचा दर ४८ हजार ३५० प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरट सोन्याच्या दर ४९ हजार ३५० प्रति १० ग्रॅम इतका आहे. तसेच चांदीचा दर मुंबईत ६३ हजार ९१० प्रति किलो आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Covishield Vaccine: सीरमकडून तात्काळ मान्यता देण्यासाठी DCGI कडे अर्ज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -