घरताज्या घडामोडीGold Price Today: गुडन्यूज! सोन्याच्या दरात आज मोठी घसरण; जाणून घ्या किंमत

Gold Price Today: गुडन्यूज! सोन्याच्या दरात आज मोठी घसरण; जाणून घ्या किंमत

Subscribe

आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाल्यामुळे आज स्वदेश बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दरात ०.३ टक्क्यांची घसरण होऊन प्रति १० ग्रॅम सोने ४७ हजार ७७६ रुपये झाले आहे. सहा दिवसांनंतर आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर, चांदीचे दर ०.५ टक्क्यांनी घसरून ६९ हजार ९ रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहे. गेल्या सत्रात सोन्याचे दर ०.९ टक्क्यांनी वाढले होते तर चांदीच्या दरात ०.६ टक्क्यांची घसरण झाली होती. गेल्यावर्षीच्या सोन्याची सर्वाधिक किंमत ५६ हजार २०० रुपये प्रति १० ग्रॅम होती. ते आता जवळपास ८ हजार ४०० रुपयांनी घसरून ४७ हजार ७७६ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ०.४ टक्क्यांनी घसरून १,७९७ डॉलर प्रति औंस झाले आहे. अमेरिकन डॉलर मजबूतीने सोन्या, चांदीच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. आशियाई एक्विटी बाजारांमध्ये आज घसरण झाली आहे, तर एसएंडपी ५०० आणि नॅस्डॅक १०० दोन्ही सर्वाधिक उच्च स्तरावर बंद झाल्यानंतर अमेरिकेतील दर घसरले. इतर धातूमध्ये चांदी ०.२ टक्के स्वस्त होऊन २६.०७ डॉलर प्रति औंस झाले आहे. तर प्लॅटिनम ०.५ टक्क्यांनी घसरून १,०८०.३७ डॉलर प्रति औंस झाले आहे.

- Advertisement -

जगातील सर्वात मोठी गोल्ड समर्थित एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा गोल्ड ईटीएप, एसपीडीआर गोल्ड ट्रस्टची होल्डिंग्स मंगळवारच्या १,०४२.२३ टन तुलनेत बुधवारी ०.२ टक्क्यांनी घसरून १,०४०.४८ टन झाले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये सोन्याची आयात २२.५८ टक्क्यांनी वाढून ३४.६ अब्ज डॉलर म्हणजे २.५४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार स्वदेशी मागणी वाढल्यामुळे सोन्याची आयात वाढली आहे. आर्थिक वर्षा दरम्यान चांदीची आयात ७१ टक्क्यांनी घसरून ७९.१ कोटी डॉलर झाली आहे.


हेही वाचा – CNG-PNG Prices Hiked: LPG गॅस सिलेंडरनंतर CNG आणि PNG गॅसच्या दरात भडका

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -