Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Gold Silver price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण , जाणून घ्या...

Gold Silver price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण , जाणून घ्या आजच्या किंमती

Related Story

- Advertisement -

अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणाची बैठक सुरू होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती स्थिर झाल्या आहेत. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस १७८०.८६ डॉलरवर स्थिर राहिला आहे. तर सोन्याच्या वायदे बाजारात मोठे बदल झाले असून सोने प्रति औंस १७८०.१० डॉलरवर विक्री झाले आहे.
दरम्यान, डॉलरच्या किंमती वाढल्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली. गुंतवणूकदार आता आंतरराष्ट्रीय बाजारातील फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणाकडे लक्ष ठेऊन आहेत. परंतु या धोरणामुळे कोणतेही मोठे बदल होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्लीच्या बाजारपेठेत सोने स्वस्त झाले

मंगळवारी देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव सलग चौथ्या दिवशी घसरला. एमसीएक्समध्ये १० ग्रॅम सोन्याचा दर ४७ हजार ४५६ वर रुपयांवर आला. तर चांदी ६८,७०९ रुपयांवर पोहचली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा १० ग्रॅम दर ४८,४०० रुपये झाला. गेल्या दोन महिन्यांतील ही सर्वोच्च पातळी होती. एमसीएक्समध्ये सोन्याचा दर ४७,१०० रुपयांना स्थिर झाला. दरम्यान चांदीच्या किंमतीमध्येही मोठ्याप्रमाणात घसरण होत आहे. दरम्यान सोमवारी दिल्लीच्या बाजारात सोन्याचे दर ८१ रुपयांनी घसरून ४६ हजार ९७६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात संमिश्र बदल

- Advertisement -

जगभर सोन्याच्या किंमतींमध्ये संमिश्र बदल दिसत आहेत. अमेरिका आणि युरोपियन बाजारात सोन्याच्या किंमती वाढू शकतात. तर दुसरीकडे, कोरोनासंसर्ग नियंत्रणात असणाऱ्या देशांतील गुंतवणूकदारांचा शेअर बाजारासह इतर माध्यमांमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. अलिकडच्या काळात भारतात सोन्याची आयात वाढली असली तरी किरकोळ मागणी कमी आहे. सध्या विवाहसोहळा आणि सणांचा हंगाम सुरु झाला असला तरी लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे सोन्याची मागणी कमी झाली आहे. परंतु कोरोना रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास सोन्याच्या किंमती वाढू शकतात. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याची किंमतीने ५६ हजारांची पातळी गाठली होती. ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी होती.


 

- Advertisement -