घरअर्थजगतGold Rate : सोन्याच्या दरात घसरण, आजचा दर 'इतका' 

Gold Rate : सोन्याच्या दरात घसरण, आजचा दर ‘इतका’ 

Subscribe

देशात सोने प्रति तोळा (१० ग्रॅम) २१० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सोनं खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेले सहा दिवस सोन्याचा भाव वाढत असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, शनिवारी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. देशात सोनं प्रति तोळा (१० ग्रॅम) २१० रुपयांनी स्वस्त झाले आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,३४० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी ४८,३४० रुपये झाला आहे. तसेच पुणे आणि नाशिकमध्ये ४८,३४० इतका दर आहे. ही माहिती गुड रिटर्न्स (Good Returns) या वेबसाईटने दिली आहे. या वेबसाईटच्या माहितीनुसार, देशात शनिवारी सोने प्रति तोळा २१० रुपयांनी घटले आहे.

गेल्या सहा दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, शनिवारी यात घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक वातावरण आणि अमेरिकेतील सत्तांतरणामुळे सेन्सक्सनेही भरारी घेतली आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला असून दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचे भावही घसरले आहेत.

- Advertisement -

मुंबईत २४ कॅरेट सोने आता ४९,३४० रुपयांत खरेदी करता येणार आहे. तसेच २२ कॅरेट सोन्याचा दर आता ४८,३४० रुपये इतका झाला आहे. तर दिल्लीमध्ये ४८,१०० रुपयांमध्ये सोनं खरेदी करता येऊ शकणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -