Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत Gold price... ऐन लग्न सराईत सोने महाग

Gold price… ऐन लग्न सराईत सोने महाग

Subscribe

ऐन लग्नसराई आणि अक्षय्य तृतीयेनिमित्त सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर पहा. कारण सोन्याच्या किंमती साठ हजारांच्या वर गेल्याने मोठा फटका बसला आहे. गुडरिटर्न्स यांच्या आकडेवारीनुसार भारतात सोन्याच्या किंमतीत १२ एप्रिलला २४०-३०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर क्रमश: ४४,५६० आणि ५५,७०० रुपये झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमूल्य धातुंच्या किंमती वेगाने वाढत असल्याने राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर २८० रुपयांनी वाढून ६०,६८० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहे. त्याचसोबत चांदीची किंमत सुद्धा ४७० रुपयांनी वाढून ७४,९५० रुपये प्रति किलो झाली आहे.

- Advertisement -

तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा दर काय?
-पुणे
२२ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅमचे दर ५५,७०० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,७६० रुपये
-नागपुर
२२ कॅरेट सोन प्रति १० ग्रॅमचा दर ५५,७०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,७६० रुपये
-नाशिक
२२ कॅरेट सोन्याच्या दर ५५,७३० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर ६०,७६० रुपये

सोन्याच्या किंमतीबद्दल तुम्हाला मोबाईलवर अपडेट्स हवे असतील तर तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड्स कॉल देऊ शकता.

- Advertisement -

दरम्यान, सरकारने १ एप्रिल पासून सोन्याच्या हॉलमार्किंग संबंधित नियम बदलले आहेत. त्यानुसार सोन्याचे दागिन्यांवर आता ६ डिजिटचा अल्फान्युमेरिक असणे अनिवार्य केले आहे. तसे नसल्यास सोन्याचे दागिने विक्री करता येणार नसल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.


हेही वाचा: 20 हजार कोटी रुपये आले कुठून? राहुल गांधींच्या प्रश्नाला अदानी समूहाने दिले उत्तर

- Advertisment -