घरताज्या घडामोडीअबब! सोन्याची किंमत रचणार इतिहास, दिवाळीत गाठणार उच्चांक!

अबब! सोन्याची किंमत रचणार इतिहास, दिवाळीत गाठणार उच्चांक!

Subscribe

सोन्याची  ४९ हजाराच्या घरात पोहोचलेली किंमत आतापर्यंतचा इतिहास पाहता सर्वाधिक आहे.

या लॉकडाऊनच्या काळात सोन्याच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. सोन्याच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. लवकरच सोन्याच्या किंमती लवकरच ५० हजारांपेक्षा जास्त होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर तज्ञांच्या म्हणण्यानूसार दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव ८० हजार रुपये प्रति तोळा होण्याची देखील शक्यता आहे.

सोमवारी सोन्याच्या किंमतीमध्ये प्रति तोळा ८५ रुपये तर चांदीमध्ये प्रति किलो १४४ रुपयांची घसरण झाली होती. तर मंगळवारी दिल्लीमध्ये २४ कॅरेट म्हणजेच ९९.९ टक्के शुद्धतेच्या  सोन्याचे भाव ४८,९८८ रुपयांवरून कमी होत ४८९३१ रुपये प्रति तोळा झाले होते.

- Advertisement -

सोन्याची  ४९ हजाराच्या घरात पोहोचलेली किंमत आतापर्यंतचा इतिहास पाहता सर्वाधिक आहे. लॉकडाऊन काळात सोन्याच्या किंमतीने असे अनेक रेकॉर्ड रचले आहेत परिणामी लवकरच सोन्याच्या किंमती ५० हजारांपेक्षा जास्त होण्याची दाट शक्यता आहे. या काळात अनेक देशांवर मंदीचे संकट आहे. अशा परिस्थितीत सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक वाढली आहे. सध्याच्या काळात गुंतवणूकदारांची सोने ही पहिली पसंत ठरत आहे. पण यामुळे व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.


हे ही वाचा – Breaking: नरिमन पॉईंट येथील ‘बँक ऑफ बहरीन आणि कुवैत’ इमारतीला आग!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -