घरदेश-विदेशGold Rate Today: सोन्याच्या दरांत पुन्हा मोठी घसरण! जाणून घ्या आजचा दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरांत पुन्हा मोठी घसरण! जाणून घ्या आजचा दर

Subscribe

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली असल्याचे दिसते. सध्या, सोने ४६ हजार २०० रूपयाच्या पातळीवर ट्रेड करत होते. दरम्यान सकाळच्या वेळी १०.३० वाजता, एप्रिल डिलीव्हरीसाठीचा सोन्याचा भाव १९ रुपयांनी घसरून ४६ हजार २२२ रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर ट्रेड करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरावर मोठा दबाव दिसत आहे. यावेळी, एप्रिल डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव ९.६५ डॉलर घसरणीसह १,७६५.७५ वर ट्रेड करत होता. तर चांदी मार्च डिलिव्हरीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात -०.३५ च्या घसरणीसह प्रति औंस २७.२८ डॉलरवर व्यापार करत आहे. एक औंस म्हणजे २८.३४ ग्रॅम आहे. MCX वर मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव सध्या ६८ हजार ७२२ रुपये प्रतिकिलोवर आहे, तर मे डिलिव्हरीची चांदी ६०२ रुपयांनी घसरण होऊन ७० हजार ७४ रुपयांवर ट्रेड करत असल्याचे सांगितले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या तेजीने व्यापार झाला. अमेरिकेत सोन्याचा व्यापार १.५८ डॉलरच्या तेजीसह १,७७३.०५ डॉलर प्रति औंसच्या किंमतीवर बंद झाला. तर चांदीचा व्यापार ०.१६ डॉलर घसरून २७.४० डॉलरवर बंद झाला आहे. goodreturns.in ने दिलेल्या माहितीनुसार, मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात पर्यायी गुंतवणुकीचे वरिष्ठ फंड मॅनेजर चिराग मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या बाँड यील्डमधील वाढीमुळे सोन्याच्या किंमतीत घट झालेली दिसून येते.

- Advertisement -

दिल्लीतील सोनं आणि चांदीचा भाव

२२ct Gold : Rs. ४५५४०
२४ct Gold : Rs. ४९६८०
Silver Price : Rs. ६९६००

मुंबईतील सोनं आणि चांदीचा भाव

२२ct Gold : Rs. ४५७४०
२४ct Gold : Rs. ४६७४०
Silver Price : Rs. ६९६००

- Advertisement -

नागपूरातील सोनं आणि चांदीचा भाव

२२ct Gold : Rs. ४५७४०
२४ct Gold : Rs. ४६७४०
Silver Price : Rs. ६९६००

नाशकातील सोनं आणि चांदीचा भाव

२२ct Gold : Rs. ४५७४०
२४ct Gold : Rs. ४६७४०
Silver Price : Rs. ६९६००

पुण्यातील सोनं आणि चांदीचा भाव

२२ct Gold : Rs. ४५७४०
२४ct Gold : Rs. ४६७४०
Silver Price : Rs. ६९६००

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -