Gold Rate Today: सोन्याच्या तोळ्यामागे दर ५० हजारांच्या घरात, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा भाव

कोरोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर सोन्या, चांदीच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते

Gold Rate Today: Gold prices 50 thousand, know the rate of 10 grams of gold in your city
Gold Rate Today: सोन्याच्या तोळ्यामागे दर ५० हजारांच्या घरात, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा भाव

आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणि वायदे बाजारपेठेमध्ये सोन्याच्या दरात तेजी दिसून आली. अमेरिकेतील सोन्याचे दर प्रति औंस २.५२ डॉलरच्या वाढीसोबत १,८९८.६६ डॉलर प्रति औंस डॉलर झाले आहेत. तर चांदीचे दर ०.०१ डॉलरच्या तेजीसोबत २८.७० डॉलर झाले आहे. तर दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा प्रंचड वेगात व्यापार होताना दिसून येत आहे. चांदीच्या दरातही कमकुवता दिसत आहे. १९ जूनच्या वाढीनंतर सोन्याचा जून मध्ये वायदा दर हा १० ग्रॅमसाठी ४८ हजार ८०३ रुपयांवर व्यापार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीचा जुलै फ्यूचर्स ११ रुपयांच्या कमजोरीसोबत ७१ हजार ४०० रुपये प्रतिकिलोवर व्यापार करताना दिसत आहे. (Gold Rate Today: Gold prices 50 thousand, know the rate of 10 grams of gold in your city)

जगभरात कोरोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर सोन्या, चांदीच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. अलीकडेच सादर झालेल्या अहवालात असे सांगण्यात आले होते की, पुढील काही महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काळात सोन्याच्या किंमती ५० हजरांच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सोन्यात कोणाला गुंतवणूक करायची असल्यास आत्ताची वेळ योग्य आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने चांदीच्या किंमती

मुंबई

२२ कॅरेट सोने: ४६,८१० रुपये
२४ कॅरेट सोने: ४७,८१० रुपये
चांदी : ७१,४०० रुपये

पुणे

२२ कॅरेट सोने: ४६,८१० रुपये
२४ कॅरेट सोने: ४७,८१० रुपये
चांदी : ७१,४०० रुपये

नाशिक

२२ कॅरेट सोने: ४६,८१० रुपये
२४ कॅरेट सोने: ४७,८१० रुपये
चांदी: ७१,४००रुपये

नागपूर

२२ कॅरेट सोने: ४६,८१० रुपये
२४ कॅरेट सोने: ४७,८१९ रुपये
चांदी: ७१,४०० रुपये

दिल्ली

२२ कॅरेट सोने: ४७,११० रुपये
२४ कॅरेट सोने: ५१,००० रुपये
चांदी: ७१,४०० रुपये

चेन्नई

२२ कॅरेट सोने: ४६,५१० रुपये
२४ कॅरेट सोने: ५०,७१० रुपये
चांदी: ७७,१०० रुपये

कोलकाता

२२ कॅरेट सोने: ४७,८९० रुपये
२४ कॅरेट सोने: ५०,६६० रुपये
चांदी: ७१,४०० रुपये

विशाखापट्टणम

२२ कॅरेट सोने: ४६,११० रुपये
२४ कॅरेट सोने: ५०,३०० रुपये
चांदी: ७७,१०० रुपये

गेल्या काही दिवसात भारतीयांनी गोल्ड ईटीएफ (ETF) मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने ग्राहक ETF गुंतवणूकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. ETF मध्ये गुंतवणूक करणे हा ग्राहकांसाठी सुरक्षित पर्याय मानला जात आहे.


हेही वाचा – Vaccine Tourism : भारतीय नागरिक परदेशातही घेऊ शकतात कोरोना लस?