Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Gold Silver price Today: सोनं झालं स्वस्त; चांदी झाली महाग; जाणून घ्या...

Gold Silver price Today: सोनं झालं स्वस्त; चांदी झाली महाग; जाणून घ्या आजचा दर

Related Story

- Advertisement -

देशात एकीकडे कोरोना महामारीचं संकट असताना दुसरीकडे इंधनदरवाढीने देखील सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी म्हणजेच आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे बघायला मिळाले. एमसीएक्सवर ऑगस्टच्या डिलिव्हरीसाठीचे सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 48 हजार 270 रुपयांवर होते, परंतु आज हा भाव 48 हजार 319 रुपयांच्या उच्चांकाने तो खाली घसरला. आज सोन्याचे दर दहा ग्रॅममध्ये 10 रुपयांनी घसरून 48 हजार 289 रुपयांवर आला होता. दरम्यान, ऑक्टोबर डिलीव्हरीचे सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅमच्या तुलनेत किंचित वाढून 48 हजार 580 रुपयांवर होता.

तसेच दुसरीकडे चांदीचा भाव 126 रुपयांनी वाढला असून 69 हजार 538 रुपये प्रतिकिलोवर होता. सप्टेंबरच्या डिलिव्हरीसाठी हा दर चांदीचा आहे. डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी चांदीचा दर 188 रुपये प्रति किलोने वाढून 70 हजार 840 रुपये प्रति किलो झाला असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 23 रुपयांनी वाढून 47 हजार 024 रुपयांवर पोहोचला होता. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसात सोन्याचे दर 10 ग्रॅम 47 हजार 001 रुपयांवर होते. यासह चांदी 399 रुपयांनी घसरून 67 हजार 663 रुपये प्रतिकिलोवर आली होती. त्या कालावधीत चांदीचा दर प्रतिकिलो 68 हजार 062 रुपये होता.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,812 डॉलर झाला असून चांदीची किंमत प्रति औंस 26.02 डॉलरवर कायम आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) यांनी असे सांगितले की, डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आणि सोनं स्वस्त तर चांदी महाग झाल्याचे बघायला मिळाले. बुधवारी महाराष्ट्रात सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. सोन्याच्या दरात 190 रुपयांची वाढ दिसून आली  राज्यात 24 कॅरेट सोन्याच्या भाव 48,080 रुपये झाली आहे. गेल्या सत्रात सोन्याचा किंमत 47,890 रुपये प्रति 10 ग्रॅम होती.  तर 22  कॅरेट सोन्याचा भाव 47,080 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. गेल्या सत्रात सोन्याचा किंमत 46,890 रुपये प्रति 10 ग्रॅम होती.. पण चांदी प्रती किलो 200 रुपयांनी घसरली आहे. गेल्या सत्रात चांदीचा दर प्रति किलो  69,400 होता. तो आता वाढून 69,200 प्रति किलो झाला आहे.


 

- Advertisement -