Gold-Silver Price: सोने महागले, चांदीही वाढली, जाणून घ्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती

IBGA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग शुल्कापूर्वीच्या आहेत. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत, परंतु किमतींमध्ये GST समाविष्ट नाही.

Gold Silver Prices Today: Gold-Silver prices fall; Know, the price of 10 grams of gold

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिक वाढ झालीय. त्याचबरोबर चांदीही महाग झालीय. या व्यापारिक आठवड्यात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 799 रुपयांनी वाढलाय. तर चांदीच्या दरात किलोमागे 2573 रुपयांची वाढ झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA च्या वेबसाईटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (28 फेब्रुवारी ते 4 मार्च) 24 कॅरेट सोन्याचा दर 50,890 होता, जो शुक्रवारपर्यंत 51,689 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 65,358 रुपयांवरून 67,931 रुपये प्रतिकिलो झाली.

IBGA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग शुल्कापूर्वीच्या आहेत. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत, परंतु किमतींमध्ये GST समाविष्ट नाही.

गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले?

28 फेब्रुवारी 2022 – 50,890 रुपये प्रति 10 ग्रॅम
01 मार्च 2022 – बाजार सुट्टी
02 मार्च 2022- 51,567 रुपये प्रति 10 ग्रॅम
03 मार्च 2022- 51,328 रुपये प्रति 10 ग्रॅम
04 मार्च 2022- रुपये 51,689 प्रति 10 ग्रॅम

गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला?

28 फेब्रुवारी 2022- रुपये 65,358 प्रति किलो
01 मार्च 2022 – बाजार सुट्टी
02 मार्च 2022- रुपये 67,112 प्रति किलो
03 मार्च 2022- रुपये 68,015 प्रति किलो
04 मार्च 2022- रुपये 67,931 प्रति किलो

मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर तपासा

आम्ही तुम्हाला सांगतो की हे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन दर पाहू शकता.


हेही वाचाः देशातील सरकारला तरुणांच्या सामर्थ्यावर विश्वास; पुण्यात सिम्बॉयसिस आरोग्य धामचे पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटन