घरदेश-विदेशGold, Silver Price today : दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं - चांदीचे दर घसरले?

Gold, Silver Price today : दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं – चांदीचे दर घसरले?

Subscribe

दिवाळी आणि लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त साधून अनेक लोक मोठ्या प्रमाणात सोन्या – चांदीची खरेदी करतात. गुंतवणूकीच्या दृष्टीने सोने – चांदीची खरेदी केली जाते.सणासुदीच्या काळात सातत्याने सोन्या चांदी मध्ये घसरण झाल्यानंतर सोन्याचे भाव आज स्थिरावले आहेत. मुंबईमध्ये सोन्याच्या दरात बदल झालेला नाही. तर चांदीची किंमत प्रति किलो ७३०० रूपये आहे. सोन्या – चांदीची किंमत दररोज चढ – उतार होत असतो. मात्र सोने आणि चांदीचे दर स्थिर आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव घसरत आहे.

तुमच्या शहरात असा आहे सोन्याचा भाव

- Advertisement -

मुंबई : ६०६०० रुपये प्रति १० ग्रॅम
पणे : ६०६०० रुपये प्रति १० ग्रॅम
नाशिक : ६०६३० रूपये प्रति १० ग्रॅम
नागपूर ६०६०० रूपये प्रति १० ग्रॅम
कोल्हापूर ६०६०० रूपये प्रति १० ग्रॅम
कोलकाता : ६०६३० रूपये प्रति १० ग्रॅम
दिल्ली ६०७५० रूपये प्रति १० ग्रॅम
चेन्नई : ६१०९० रूपये प्रति १० ग्रॅम

चांदीचा भाव घसरला

- Advertisement -

या आठवड्यामध्ये चांदीच्या दरामध्ये दिवसेंदिवस घसरण होत आहे. 6 नोव्हेंबर रोजी चांदी 200 रुपयांनी महागली. 7 नोव्हेंबर रोजी किंमती 700 रुपयांनी घसरल्या. 8 नोव्हेंबर रोजी 1000 रुपयांची स्वस्ताई आली. तर 9 नोव्हेंबर रोजी किंमती 300 रुपयांनी उतरल्या. 10 नोव्हेंबर रोजी चांदीने घसरणीला ब्रेक लावला. चांदीत 800 रुपयांची दरवाढ झाली. 11 नोव्हेंबर रोजी एक हजारांची घसरण झाली.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक Verify HUID द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धतादेखील तपासू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -