ऐन लग्नसराईत सोने खरेदी महागली; तोडले सर्व रेकॉर्ड, जाणून घ्या आजचा भाव

gold silver price today 24 january 2023 gold silver price today in delhi mumbai chennai kolkata jaipur lucknow and other cities

ऐन लग्नसराईत भारतात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी वाचाच. आज सोन्याच्या दराने मागील काही दिवसातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आज प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 57,000 रुपयांवर पोहचला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किंमतीत 0.4 टक्क्यांनी वाढ झाली त्यामुळे प्रति 10 ग्रॅम सोनं 57050 रुपयांवर पोहचलं आहे. तर चांदीच्या दरात 0.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदी 68301 रुपये प्रति किलोवर पोहोचली.

अमेरिकन डॉलरच्या किंमतीत घसरण झाल्याने जागतिक बाजारपेठेत सोन्याची किंमत 2 टक्क्यांनी वाढून 1,935.69 डॉलर प्रति औंस झाली आहे. यामुळे गुंतवणूकदार या आठवड्याच्या अखेरीस यूएस चौथ्या तिमाहीतील जीडीपी वाढीच्या अंदाजाची वाट पाहत आहेत. इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.4 टक्क्यांनी वाढून 23.54 डॉलर प्रति औंस झाली आहे. मंगळवारी फ्युचर्स ट्रेडमध्ये सोन्याचा भाव 260 रुपयांनी वाढून 57,075 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

सोन्या-चांदीच्या भावात वाढ

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, व्यापाऱ्यांनी केलेल्या नव्या खरेदीमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव 0.64 टक्क्यांनी वाढून 1,957.90 डॉलर प्रति औंस झाला आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर 68,564 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे. स्पॉट मार्केटमध्ये मजबूत मागणी असताना व्यापाऱ्यांनी आपली होल्डिंग वाढवल्यामुळे मंगळवारी चांदीचा भाव 600 रुपयांनी वाढून 68,564 रुपये प्रति किलोवर पोहोचला

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर मार्चमधील डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 600 रुपयांनी किंवा 0.88 टक्क्यांनी वाढून 68,564 रुपये प्रति किलोवर गेला आणि त्यात 17,054 लॉटची उलाढाल झाली. बाजारातील सकारात्मक ट्रेंडमध्ये व्यापार्‍यांनी केलेल्या नव्या खरेदीमुळे चांदीच्या दरात वाढ झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. जागतिक पातळीवर, न्यूयॉर्कमध्ये चांदीचा भाव 0.98 टक्क्यांनी वाढून 23.79 डॉलर प्रति औंस झाला.

जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव

१) दिल्लीत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं 57,650 रुपये झालं आहे.

२) जयपूरमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं 57,650 रुपयांना विकली जात आहे.

३) मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 57,490 रुपये आहे.

४) पाटण्यात 24K सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 57,160 रुपये आहे.

५) कोलकत्यात 10 ग्रॅम 24K सोन्यासाठी 57,490 रुपये मोजावे लागतील.

६) बंगळुरूमध्ये 24K सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी 57,550 किंमत मोजावी लागतायत.

७) हैदराबादमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या भाव 57,490 रुपये आहे.

८) चंदीगडमध्ये सोन्याचा भाव 57,650 रुपयांवर पोहचला आहे.

९) लखनौमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 57,650 रुपये आहे.


गर्भाशयाच्या कॅन्सरमधून वाचणार आता महिलांचा जीव, सीरमची पहिली ‘HPV’ लस लाँच