Gold Price Today: सोनं-चांदी झालं स्वस्त, करा लवकर खरेदी!

Gold Price Today
Gold Price Today

मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ झाली होती. पण आज सोन्या-चांदीचे दर घसरले आहेत. एमसीएक्स एक्सचेंजवर बुधवार सकाळी सोन्याच्या किंमतीत १७५ रुपयांची घसरण झाली असून ४८ हजार ३९१ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. याशिवाय जागतिक बाजारपेठेतही बुधवारी सकाळी सोन्याचे स्पॉट आणि फ्युचर्सच्या किंमतीत घट दिसून येत आहे.

सोन्याप्रमाणे चांदीच्या किंमतीत देखील बुधवारी सकाळी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर बुधवारी सकाळी चांदीच्या किंमतीत ०.८८ टक्के म्हणजे ५५९ रुपयांची घसरण झाली असून ६२ हजार ६३९ रुपये प्रति किलोग्रॅम चांदी झाली आहे. याशिवाय जागतिक बाजारात चांदीची किंमत घसरली आहे.

जागतिक बाजारात बुधवारी सकाळी सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याची किंमत कॉमेक्सवर ०.३९ टक्के म्हणजे ७.१० डॉलर घसरण झाली असून १,८८१.८० डॉलर प्रति औंस झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत १.२९ टक्के म्हणजेच ०.३१ डॉलरने घसरण होऊन २३.७८ डॉलर प्रति औंस झाली आहे.

goodreturnsच्या माहितीनुसार, मुंबईत सध्या २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६ हजार ९३० प्रति १० ग्रॅम झाली आहे. तर २४ कॅरेटच्या सोन्याची किंमत ४७ हजार ९३० रुपये झाली आहे. तसेच चांदीचे किंमती १०० ग्रॅम ६ हजार २२० रुपये झाली आहे.


हेही वाचा – ‘निवार’नंतर पुन्हा तामिळनाडूवर चक्रीवादळाच्या संकटाचं सावट!