ग्राहकांसाठी सुवर्णसंधी: सोन्याची किंमत ५० हजारांच्या खाली!

gold price

भारतात पुन्हा सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. ऑक्टोबरमध्ये पाच दिवसांत चौथ्यांदा सोन्याचे भाव एमसीएक्सवर घसरले आहेत. आज सोन्याचा किंमतीत घसरण झाली आहे. ०.२७ टक्क्यांनी घसरून सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४९ हजार ७७१ रुपये झाली आहे. तर एमसीएक्सवर चांदीच्या किंमतीत ०.५ टक्के घसरून प्रति किलोग्रम ५९ हजार ३२९ रुपये झाली आहे.

मागील सत्रात सोन्याची किंमतीत ०.६४ टक्के म्हणजेच ३०० रुपयांनी वाढली, तर चांदीची १.८ टक्के म्हणजेच १ हजार ६० रुपये प्रति किलोग्रॅम वाढली होती. भारतात या आठवड्यात सोन्याच्या-चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घट झाली आहे. या आठवड्यात सोने २ हजार रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ९ हजार रुपये प्रति किलोग्रॅम स्वस्त झाले आहे.

मजबूत डॉलरमुळे जागतिक बाजारात सोन्याचा दबाव कायम आहे. या आठवड्यात सोन्यामध्ये ४ टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. आज यामध्ये ०.२ टक्क्यांनी घसरण झाली असून १,८६४.४७ डॉलर प्रति ग्रॅम झाले आहे. तर चांदीमध्ये १.१ टक्क्यांची घसरण होऊन २२.९५ डॉलर प्रति ग्रॅम झाली आहे. प्लॅटिनममध्ये ०.३ टक्क्यांची घसरण होऊन ८४६.७२ डॉलर आणि पॅलेडियम २,२२६.४४ डॉलर झाले आहे.

या आठवड्यात डॉलर इंडेक्स १.५ टक्क्यांनी वधारला होता, जो एप्रिलच्या सुरुवातीनंतरचा चांगला स्तर आहे. एक मजबूत डॉलर सोन्याला अन्य चलनांच्या धारकांसाठी महाग करते.


हेही वाचा – आंतरराष्ट्रीय न्यायालयात वोडाफोनचा भारताविरोधात मोठा विजय