Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Gold Silver Price: सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price: सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

सोन्याच्या दरात झालेली घट पाहता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा

Related Story

- Advertisement -

सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच खरेदी करा. कारण आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिल्लीत सराफाच्या बाजारात ६६१ रुपयांनी सोन्याचे दर घसरले आहे. तर चांदीमध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी सोन्याचे दर चांगलेच घसरले आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या मंडळींना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी सोन्याच्या दरात दररोज वाढ होत होती. त्यामुळे लग्नसराईकरता लागणारे सोने कसे खरेदी करावे?, असा प्रश्न ग्राहकांना पडला होता. मात्र, आज सोन्याच्या दरात झालेली घट पाहता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सोन्यासह चांदीचे दरही घटले

सोन्याबरोबर चांदीच्या दरात देखील घट झाली आहे. सोन्याच्या दरात ६६१ रुपयांची घट झाल्यामुळे आज सोन्याचे दर ४६ हजार ८४७ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. एचडीएफसी सिक्योरिटीनुसार गुरुवारी सोने ४७ हजार ५०८ रुपये प्रति १० ग्रॅमवर होते. तर चांदी ३४७ रुपयांनी कमी होऊन ६७ हजार ८९४ रुपये प्रति किलो ग्रॅम होती.

यामुळे सोने झाले स्वस्त

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात घट पाहायला मिळाली. सोन्याच्या वायदा भावात घट झाल्यामुळे सोन्याचे दरही घसरले आहेत.


हेही वाचा – Boycott China नावापुरताच , भारतीय बाजारपेठांत वाढली चीनची भागीदारी


- Advertisement -

 

- Advertisement -