Gold-Silver Price Today: सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर?

भारतीय सराफा बाजारात आज (बुधवार) सोने आणि चांदीच्या (Gold-Silver Price)  दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक आनंदाची वार्ता आहे. आज २२ कॅरेट सोने-चांदीच्या घरात घसरण पहायला मिळत आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४७ हजार ५०० रूपये इतका आहे. मंगळवारी २२ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ४७ हजार ७५० रूपये इतका होता. मात्र, सोन्याच्या दरात प्रतितोळ्यामागे २५० रूपयांची घसरण झाली आहे. तर सोन्याचा दर प्रतितोळा ५१ हजार ८२० रुपये इतका आहे.

९१६ शुद्धतेच्या सोन्याचा दर आज ४६ हजार ४४३ रुपयांवर आला आहे. तर ७५० शुद्धतेचे सोने ३८ हजार २७ रूपयांना उपलब्ध आहे. ५८५ शुद्धतेच्या सोन्याचा दर आज २९ हजार ६६१ इतक्या रूपयांवर पोहोचले आहेत. याव्यतिरिक्त ९९९ शुद्धतेची एक किलो चांदी ६० हजार ७६५ रूपयांना विकण्यात आली आहे.

हेही वाचा : Gold Price Today : सोने पुन्हा एकदा महागले; पटापट तपासा तोळ्याचा भाव

सोने-चांदी झाले स्वस्त?

सोने आणि चांदीच्या दरात आज घट झाली आहे. आज ९९९ शुद्धतेचे सोने मागील दिवसाच्या तुलनेत ४२३ रूपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचवेळी ५८५ शुद्धचेचे सोने आज ३८८ रूपयांनी स्वस्त झाले आहे. याव्यतिरिक्त ७५० शुद्धतेच्या सोन्याच्या दरात आज ३१७ रूपयांची घट झाली आहे.

प्रमुख चार शहारांतील दर काय?

आज राजधानी दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ४७ हजार ५०० रूपये आहे. तर मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ४७ हजार ५०० इतका आहे. तर चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ४७ हजार ४०० रूपये प्रतितोळा आहे. तर चांदीचा दर ५१ हजार ७१० रूपये इतका आहे. कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ४७ हजार ५०० रुपये प्रति तोळा आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१ हजार ८२० इतका आहे.


हेही वाचा : पेट्रोल-डिझेलवरील कर ५० टक्के कमी करा, केशव उपाध्ये यांची मागणी