घरताज्या घडामोडीवटपौर्णिमेदिवशी सोने-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर?

वटपौर्णिमेदिवशी सोने-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर?

Subscribe

जागतिक बाजारपेठेत वाढ होऊनही आज भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या (Gold-Silver Price Today) दरात मोठी घसरण झाली आहे. लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे सोन्याच्या किमती कमी होऊन भाव ५० हजारांच्या जवळ आला आहे. त्याचप्रमाणे आज वटपौर्णिमेचा दिवस असून सोने आणि चांदीचे दर कमी झाले आहेत. चांदींचीही ६० हजारांच्या आसपास विक्री झाली आहे.

सोन्याचा दर आज ५० हजार ७२५ रूपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर कालच्या दिवशी सोन्याचा दर ५१ हजार ४३५ रूपये प्रति दहा ग्रॅम आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, सोन्याचा दर ७१० रूपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे. मात्र, असं असूनही सोने आजही त्याच्या उच्चांकीच्या पातळीपेक्षा ५ हजार ४७५ रूपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे.

- Advertisement -

आज मुंबईत सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी ५१७१०/१० ग्रॅम आणि २२ कॅरेटसाठी ४७४००/१० ग्रॅम इतका आहे. मुंबई शहरातील सोन्याचा दर किंवा किंमत मुख्य दोन घटकांवर अवलंबून असते. पहिलं म्हणजे सोन्याची शुद्धता आणि दुसरं म्हणजे सोन्याचे वजन. २२ आणि २४ कॅरेटच्या सोन्यासाठी वेगवेगळ्या वजनाच्या श्रेणी उपलब्ध आहेत. ८ ग्रॅम, १० ग्रॅम, १०० ग्रॅम, १ किलोग्रॅम आणि यापेक्षा अधिक श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची खरेदी अत्यंत वेगाने होत आहे. तर सोन्याचा भाव ७.९३ डॉलरच्या वाढीसह १,८२८.३९ डॉलर प्रति औंस झाला आहे. तर दुसरीकडे चांदी ०.१६ डॉलरच्या वाढीसह २१.२८ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. चांदीचे दर आज ६० हजार १६४ रूपये प्रति किलोवर खुला झाला आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा भाव ६० हजार ९१२ प्रति किलोच्या दराने बंद झाला होता.

- Advertisement -

जयपूर सराफा बाजारात आज सोन्याचा भाव ११०० ते ११५० रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत घसरला आहे. यावेळी चांदीच्या दरात प्रति दहा ग्रॅम १२५० रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात घट झाली आहे. गुंतवणूकदारांसह मोठे खरेदीदारही नवीन खरेदीपासून दूर असल्याचे दिसून आले. चांदीची औद्योगिक आणि व्यावसायिक मागणीत घट झाल्याचे सांगितले जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी चांदीचे भाव घसरल्याने नवीन गुंतवणूकदारांनीही मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्यापासून माघार घेतली आहे.


हेही वाचा : ४ वर्षांची नोकरी, सेवानिधी पॅकेज अन् बरेच काही; जाणून घ्या, सैन्यातील अग्निपथ योजनेची वैशिष्ट्ये


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -