Gold Silver Prices Today : सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या, 10 ग्रॅम सोन्याचा भाव

सोन्या-चांदीच्या किमतीतील चढ-उतारांमुळे सोने 48,000 रुपयांच्या खाली आणि चांदी 62,000 हजारांच्या खाली आली आहे. जर आपण आजच्या सोने-चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 0.01 टक्क्यांच्या किंचित वाढीसह व्यवहार करताना दिसत आहे. चांदीचा दर 0.08 टक्क्यांनी वाढला आहे.

Gold Silver Prices Today: Gold-Silver prices fall; Know, the price of 10 grams of gold

सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीतील चढ-उतारांमुळे सोने 48,000 रुपयांच्या खाली तर, चांदी 62,000 हजारांच्या खाली आली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत 0.01 टक्क्यांनी वाढ झाली असून, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,659 रुपये झाली आहे. आजच्या व्यवहारात चांदी 0.08 टक्क्यांच्या वाढीसह 61,030 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

घरबसल्या सोन्याची किंमत जाणून घ्या..

हे सोन्या-चांदीचे दर तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम सोने-चांदीचे दर पाहायला मिळतील.

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता तपासा

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही सोन्यासंबंधीत कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतही तत्काळ माहिती मिळणार आहे.

गिफ्टमध्ये मिळालेल्या सोन्यावरही टॅक्स लागू

भारतात एखाद्या लग्नात किंवा लहान मुलाचे बारसे अशा कार्यक्रमात सोन्याची भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का? भेटवस्तू म्हणून मिळालेल्या सोन्यावर तुम्हाला कर भरावा लागू शकतो. एका निश्चित किमतीच्यावर जर तुम्ही सोन्याची भेटवस्तू देत असाल तर, तुम्हाला कर भरावा लागणार आहे.भेटवस्तूमध्ये मिळालेल्या सोन्यावर कर कसा लावला जातो,असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल,समजा तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून भेट म्हणून सोने किंवा दागिने मिळाले असतील आणि त्या सोन्याची किंवा दागिन्यांची किंमत 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर, त्यावर कर भरावा लागेल.


हेही वाचा – अर्थव्यवस्थेला मजबूत करतायत IT कंपन्या; Infosys देणार 55,000 नोकऱ्या