Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Gold Silver Price: गेल्या दोन सत्रात १६०० रुपयांची घसरण झाल्यानंतर आज सोन्याच्या...

Gold Silver Price: गेल्या दोन सत्रात १६०० रुपयांची घसरण झाल्यानंतर आज सोन्याच्या दरात वाढ

Related Story

- Advertisement -

गेल्या दोन सत्रात घसरण झाल्यानंतर आज घरगुती बाजारात सोन्याची किंमतीत वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा दर ०.४ टक्क्यांनी वाढला असून ४६ हजार ९११ रुपये प्रति १० ग्राम सोने झाले आहे. चांदीच्या दरात ०.०४ टक्क्यांची घसरण होऊन ६७ हजार ५७१ प्रति किलोग्राम झाले आहे. गेल्या दोन सत्रात सोन्याच्या दरात तब्बल १६०० रुपये प्रति १० ग्राम स्वस्त झाले होते. या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या सध्याच्या किंमतीपेक्षा २ हजार ५०० रुपये किंमत कमी होती.

जागतिक बाजारात १५ महिन्यानंतर सर्वाधिक झालेल्या साप्ताहिक घसरणीनंतर आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. स्पॉट गोल्ड ०.५ टक्क्यांनी वधारला असून १ हजार ७७२,३४ डॉलर प्रति औंसवर आहे. गेल्या आठवड्यात यामध्ये सहा टक्के घसरण झाली होती. चांदी ०.६ टक्क्यांनी वाढून २५.९५ डॉलर प्रति औंसवर होती आणि प्लॅटिनम ०.४ टक्के वाढून १ हजार ३७.८९ डॉलर प्रति औंसवर आहे.

- Advertisement -

दरम्यान गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूकीत गेल्या महिन्यात घट झाल्याचे दिसले होते. ५७ टक्क्यांनी गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक घसरून २८८ कोटी रुपये इतकी झाली आहे.

देशात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग असणे केंद्र सरकारने १५ जून २०२१ पासून बंधनकारक केले. यामुळे आता कोणत्याही सराफ व्यापाराला विना हॉलमार्कचे दागिने विक्री करता येणार नाही. तसेच ज्वेलर्सने या नियमांचे पालन न केल्यास त्याच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. या नियमांनुसार, १६ जून २०२१ पासून २५६ जिल्ह्यांत १४, १८ व २२ कॅरेट सोन्याच्या दागिने/ कलात्मक वस्तूंवर हॉलमार्क असेल तर ते विक्री करण्याची परवानगी देण्यात येईल. देशातील इतर जिल्ह्यांत २०, २३ व २४ कॅरेट सोन्याच्या दागिने/ कलात्मक वस्तूंसाठी हॉलमार्क टप्प्याटप्प्याने बंधनकारक करण्यात येईल.

- Advertisement -