Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीला झळाली; जाणून घ्या आजची सोन्या-चांदीची किंमत

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीला झळाली; जाणून घ्या आजची सोन्या-चांदीची किंमत

Related Story

- Advertisement -

आज-सोन्या चांदीला झळाली मिळाली असून आज सोमवारी सोन्या-चांदीच्या वायद्याच्या दरात वाढ झाल्याचे समोर आले आहे. जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमतीत घट झाली असून मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमती ४० रुपयांनी वाढल्या आहेत. यासह दिल्लीमध्ये आता १० ग्रॅम सोन्याची किंमत ४९ हजार १४० रुपयांवर पोहोचली आहे. तसेच आता एक किलो चांदीची किंमत ६८ हजार ७१० रुपये झाली आहे. गेले काही दिवसांपूर्वी मागील सत्रातील व्यवहार सोन्याचे दर १० ग्रॅम ४७ हजार ९३ रुपयांवर बंद झाले होते. चांदी देखील ९७ रुपयांनी घसरून ६६ हजार ८५६ रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. यासोबत गेल्या व्यापार सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६६ हजार ९५३ रुपये इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति औंस १ हजार ८०५ डॉलरवर होता तर चांदीची किंमत प्रति औंस २५.३९ डॉलरवर स्थिर आहे.

आजच्या सोनं-चांदीच्या वाढीमुळे सोन्याचे दर गेल्या एका महिन्यात सर्वोच्च स्तरावर पोहोचल्याचे सांगितले जात आहे. एमसीएक्सवर सोन्याची वायदे किंमत ०.३८ टक्के म्हणजे १८५ रुपयांनी वाढली आहे. या वाढीनंतर सोन्याचे दर ४८ हजार २७८ रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीची किंमत ०.२८ टक्क्यांनी म्हणजे १८८ रूपयांनी वाढली आहे. आजच्या वाढीनंतर चांदीचे दर ६७ हजार ४३४ रुपये प्रति किलोच्या स्तरावर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील आजचे सोन्याचे दर ०.३ टक्क्यांनी वाढून १ हजार ८१८ डॉलर प्रति औंसच्या स्तरावर पोहोचले आहेत तर चांदीच्या दरात आज घसरण झाली असून चांदीचे दर २५.१८ डॉलर प्रति औंस आहेत.

आजचे २४ कॅरेट सोन्याचे भाव

- Advertisement -

मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचे भाव ४८ हजार ४० रुपये प्रति तोळा आहे. दरम्यान चेन्नई आणि कोलकातामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर साधारणतः ४९ हजार ५६० रुपये आणि ५० हजार ३०० रुपये प्रति तोळा आहे. यासह दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१ हजार ४४० रुपये प्रति तोळा आहे.


कॅनडा सरकारने २१ ऑगस्टपर्यंत भारतीय फ्लाईट्सवर घातली बंदी
- Advertisement -