घरदेश-विदेशGold-Silver rate Today : सोनं 55 हजार पार,चांदीची चमकही वाढली; गुंतवणूकदारांनी करावे...

Gold-Silver rate Today : सोनं 55 हजार पार,चांदीची चमकही वाढली; गुंतवणूकदारांनी करावे काय?

Subscribe

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 14 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. या युद्धाचे परिणाम भारतात देखील जाणवू लागले आहेत. खाद्यतेल, इंधनासह अनेक वस्तूंचे भाव आता वाढू लागले आहेत. अशात आता सोन्याचे दर देखील गेल्या दीड वर्षांच्या उच्चांकावर गेले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर बुधवारी सोन्याच्या दराने 55 हजारांची पातळी ओलांडली आहे.

रशियावर अमेरिका आणि इतर सहयोगी देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होतेय. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येतोय. सकाळी 9.45 वाजता MCX वर सोन्याचा फ्युचर्स दर हा 1.64 टक्क्यांनी वाढला. यामुळे सोने प्रति 10 ग्रॅम 55,111 वर पोहोचला आहे. त्यामुळे दीड वर्षांत ही सर्वात मोठी पातळी आहे. यामुळे चांदीचा दर 2.19 टक्क्यांनी वाढून 72,950 रुपये प्रति किलो झालेय.

- Advertisement -

सराफा बाजारात सोन्याचा भाव येत्या काही दिवसांत 56 हजारांच्या पुढे जाऊ शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव 2,035.97 च्या वर ट्रेन्ड करत राहिल्यास भारतीय बाजारात तो 56,580 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेतही सोन्याचा दर 55 हजारांच्या पुढे गेला होता.

सर्व देशांमध्ये वाढतोय सोन्याचा साठा

रशिया-युक्रेन संकटामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर संकट आले आहे. यामुळे सर्वच देश सोन्याची खरेदी जोरात करत आहेत. जगातील सर्वात मोठ्या गोल्ड-बॅक्ड एक्स्चेंज-ट्रेडेड फंड (ETF) SPDR गोल्ड ट्रस्टची सोन्याची होल्डिंग वाढून 1,067.3 टन झाली, जी मार्च 2021 नंतरची सर्वोच्च आहे. मात्र, भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी आता सोने खरेदी करावे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -