घरताज्या घडामोडीसुवर्णसंधी ! 'Post Office' च्या 'या' योजनेत फक्त 417 रुपयांत होऊ शकता...

सुवर्णसंधी ! ‘Post Office’ च्या ‘या’ योजनेत फक्त 417 रुपयांत होऊ शकता करोडपती

Subscribe

भविष्याची तरतूद करण्यासाठी सामान्य माणूस रोजच्या कमाईतून पै-पै जमा करत असतो. मात्र या पैशाचे व्यवस्थापन करण्यासाठी काही वेळेस अनेक अडचणी निर्माण होतात. सामान्य माणूस हा शेअर बाजार असो वा म्युच्युअल फंड असो त्यात पैसे गुंतवण्यासाठी घाबरतोच.त्यामुळे या जोखिमेपेक्षा सामान्य नागरिक सोयीचा पर्याय म्हणून पोस्ट ऑफीसच्या स्कीमकडे वळतात.

पोस्ट ऑफिसची बचत योजना सामान्य नागरिकांसाठी खूप फायदेशीर ठरते. भविष्याची तरतूद करण्यासाठी सामान्य माणूस रोजच्या कमाईतून पै-पै जमा करत असतो. मात्र या पैशाचे व्यवस्थापन करण्यासाठी काही वेळेस अनेक अडचणी निर्माण होतात. सामान्य माणूस हा शेअर बाजार असो वा म्युच्युअल फंड असो त्यात पैसे गुंतवण्यासाठी घाबरतोच. त्यामुळे या जोखमीपेक्षा सामान्य नागरिक सोयीचा पर्याय म्हणून पोस्ट ऑफिसच्या स्कीमकडे वळतात. पोस्टात बचत करण्याचे अनेक फायदे असतात. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरतात. दरम्यान, पोस्ट ऑफिसच्या एका योजनेत तुम्ही करोडपती बनू शकता. या स्कीममध्ये फक्त 417 रुपयांमध्ये करोडपती होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला दररोज 417 रुपये गुंतवावे लागणार आहेत. या पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेत खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा असणार आहे. हा कालावधी 5 वर्षांमध्ये तुम्ही दोनदा वाढवू शकता.

या पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेत तुम्हाला कर लाभसुद्धा मिळतो. याशिवाय या योजनेत वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळतो. याशिवाय तुम्हाला दरवर्षी चक्रवाढ व्याजाचा लाभही मिळतो. पगारदार, स्वयंरोजगार, पेन्शनधारक इत्यादींसह कोणताही रहिवासी पोस्ट ऑफिसच्या पीपीएफमध्ये खाते उघडू शकतो.

- Advertisement -

जर तुम्ही 15 वर्षे म्हणजे मॅच्युरिटीपर्यंत गुंतवणूक केली आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वार्षिक जमा केले, म्हणजे एका महिन्यात 12500 रुपये आणि एका दिवसात 417 रुपये, तर तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख होईल. वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवल्यास तुमची एकूण गुंतवणूक 37.50 लाख रुपये होईल. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला 7.1 टक्के व्याजदरासह 65.58 लाख रुपये मिळतील. म्हणजेच 25 वर्षांनंतर तुमचा एकूण निधी 1.03 कोटी होईल.

पोस्ट ऑफिस पीपीएफ खात्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र
  • मतदार ओळखपत्र
  • पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • आधार कार्ड
  • पत्ता पुरावा- मतदार ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • नावनोंदणी फॉर्म- फॉर्म ई

हेही वाचा – Influence: महागाईची झळ! साबण आणि डिटर्जंटचे दर 20 टक्क्यांनी महागले

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -