Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत Goldman Sachs Layoff : कोरोना काळात भरतीप्रक्रिया, तर, आता लॉकडाऊन संपल्यावर नोकरकपात

Goldman Sachs Layoff : कोरोना काळात भरतीप्रक्रिया, तर, आता लॉकडाऊन संपल्यावर नोकरकपात

Subscribe

Goldman Sachs Layoff : अनेक आयटी, ई-कॉमर्स कंपन्यांनी नोकर कपात केल्यानंतर आता अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी गोल्डमन सॅच ग्रुप इंकनेही कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, ३२०० कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते. बुधवारपासून कामगार कपातीला सुरुवात होणार आहे.

Goldman Sachs Layoff | वॉशिंग्टन – लॉकडाऊन संपल्यानंतर संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचं (Recession) सावट पसरलं आहे. त्यामुळे जगभरातील अनेक कंपन्यांमधून लाखो रोजगार कपात (Layoffs) करण्यात येत आहेत. तोटा भरून काढण्यासाठी, नुकसान कमी करण्याकरता कर्मचारी कपात करण्यात येत आहे. अनेक आयटी, ई-कॉमर्स कंपन्यांनी नोकर कपात केल्यानंतर आता अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी गोल्डमन सॅच ग्रुप इंकनेही (American multinational investment bank and financial services company) कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, ३२०० कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते. बुधवारपासून कामगार कपातीला सुरुवात होणार आहे.

हेही वाचा – अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता! Amazon मध्ये १८ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

- Advertisement -

गोल्डमन सॅच ग्रुप इंकने या नोकर कपातीबाबत अद्यापही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. गुंतवणूक बँकिग विभागात सर्वाधिक कपात करण्यात येणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या तिमाहीतील आकडेवारीनुसार कंपनीत ४९ हजार १०० कर्मचारी कार्यरत आहेत. तर, यापैकी ६.५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली जाऊ शकते. म्हणजेच, जवळपास ३२०० कर्मचारी आपली नोकरी गमावू शकतात. महत्त्वाचं म्हणजे, गोल्डमन सॅने कोरोना काळात कर्मचारी भरती प्रक्रिया राबवली होती. मात्र, आता मंदीचे सावट पसरल्याने विविध विभागातील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा Government Jobs 2023 : नव्या वर्षात 30 हजार नोकऱ्यांची भेट, कुठे आहे भरती?

- Advertisement -

Amazon मध्येही १८ हजार कर्मचारी कपात

कोरोनापश्चात जगभरातील अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली आहे. यामध्ये ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉननचाही समावेश आहे. अॅमेझॉनने नोव्हेंबर महिन्यात १० हजार कपातीची घोषणा केली होती. आता १८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अनिश्चित अर्थव्यवस्थेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. गोल्डमन सॅच, अॅमेझॉनसहीत अनेक जागतिक कंपन्यांनी नोकर कपातीचे शस्त्र उगारले आहे. यामध्ये गुगल आणि मायक्रोसॉफ्ट कंपन्यांचाही समावेश आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -