पेट्रोल-डिझेल अजून स्वस्त होणार?

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये घसरण होत आहे.

good news : brent crude price falls below $69 per barrel

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये घसरण होत आहे. अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे ही घसरण होत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. कच्च तेल अर्थात क्रूड ऑईलच्या किंमती घसरल्यामुळे सहाजिकच यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्येही घट झाली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय तेल बाजारात प्रति तेल पिंपाचा दर ६९ डॉलरपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे येत्या काही काळात पेट्रोल-डिझेलचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सहाजिकच वाढत्या महागाईलादेखील आळा बसेल. त्यामुळे येत्या काही काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी कमी झाल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि देशातील सर्वसामान्यांसाठी ही बाब दिलासादायक ठरेल. दरम्यान, ऐन दिवाळीच्या काळात इंधनाच्या दरामध्ये सातत्याने झालेली घट ही सामान्य लोकांसाठी सुखदायक ठरली आहे.


वाचा: हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण गाजणार – अजित पवार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल पुरवठयामध्ये कपात करु नका असे आवाहन, काही दिवसांपूर्वीच ‘ओपेक’ला केले आहे. ओपेक ही जगातील तेल पुरवठादार देशांची संघटना आहे. मध्यंतरी ओपेकमधील प्रमुख तेल निर्यातदार सौदी अरेबियाने डिसेंबरमध्ये तेल पुरवठयामध्ये कपात करु असं जाहीर केलं होतं. त्यानंतरच डोनाल्ड ट्रम्प यांना हे आवाहन करावं लागलं. कारण सौदी अरेबियाने मनमानी केल्यास त्यांचे अमेरिकेसोबतचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. दरम्यान अमेरिकेने इराणकडून तेल खरेदी करण्यावर याआधीच निर्बंध लावले आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या घसरत्या किंमतींमुळे अमेरिकेला भारत आणि अन्य ७ देशांना इराणकडून तेल खरेदीची परवानगी द्यावी लागली आहे.

दरम्यान, तज्ज्ञांच्या मतानुसार- भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या दरातील कपात अशीच सुरु राहिल्यास आपोआपच सामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचे भावही उतरतील आणि त्यांचे दैनंदिन आयुष्य अधिक सुखकर होईल. मात्र, तुर्तास तरी ही बाब सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरते आहे.


वाचा: देशात भयानक स्थिती; लढण्यासाठी सज्ज व्हा – शरद पवार