घरताज्या घडामोडीEPFO Pesnion: लाखो पेन्शनर्ससाठी खुशखबर! पेन्शनमध्ये होणार नऊ पटीने वाढ

EPFO Pesnion: लाखो पेन्शनर्ससाठी खुशखबर! पेन्शनमध्ये होणार नऊ पटीने वाढ

Subscribe

केंद्र सरकार पेन्शन स्कीमच्या सब्स्क्रायबर्सना लवकरच एक मोठं गिफ्ट देणार आहे. तुमच्या पेन्शनमध्ये आता ९ पटीने वाढ होणार आहे. ईपीएसशी संबंधित लोकांना दरमहा प्रत्येकी एक हजारांऐवजी ९ हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे किमान पेन्शनमध्ये १००० रूपयांपेक्षा ९००० रूपयांपर्यंत वाढ होऊ शकते. या संबंधित फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बैठकीत कामगार मंत्रालय हा निर्णय घेऊ शकते. फेब्रुवारीमध्ये होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

नवीन वर्षात केंद्र सरकारकडून पेन्शन धारकांना भेट

पेन्शन योजनेत सध्या किमान पेन्शन १००० रुपये आहे, मात्र ती ९००० रुपये केली जाऊ शकते. किमान पेन्शनची रक्कम वाढवावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून पेन्शन धारकांकडून करण्यात येत आहे. या विषयावर यापूर्वीही अनेकदा चर्चा झाली आहे. त्यामुळे नवीन वर्षात केंद्र सरकार पेन्शन धारकांना ही भेट देऊ शकते. किमान पेन्शन वाढवण्याचा निर्णय संसदेच्या स्थायी समितीच्या शिफारशींच्या आधारावर घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

मार्च २०२१ मध्ये संसदेच्या स्थायी समितीने याबाबतचा सल्ला दिली होता. किमान पेन्शनच्या रकमेला सध्याच्या एक हजार रूपयांवरून ३ हजार रूपयांची वाढ करण्यात यावी, असे पेन्शन धारकांचे म्हणणे आहे. किमान पेन्शन ही संबंधित व्यक्तीच्या अंतिम पगारावरून निर्धारीत व्हावी, असा देखील सल्ला दिला जात आहे.

१० वर्षे नोकरी करणं बंधनकारक

EPFO अंतर्गत PF मिळणाऱ्या सर्व वापरकर्त्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना-१९९५ आहे. संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वयाच्या ५८ व्या नंतर किमान १००० रुपये पेन्शन दिली जाते. परंतु यासाठी कर्मचाऱ्याला किमान १० वर्षे नोकरी करणं बंधनकारक आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत केएल राहुलची १८ स्थानांची झेप, कोहलीला मोठा झटका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -