घरअर्थजगतखुशखबर! पेन्सिल, शार्पनरसह अनेक वस्तू होणार स्वस्त, अर्थमंत्र्यांची घोषणा

खुशखबर! पेन्सिल, शार्पनरसह अनेक वस्तू होणार स्वस्त, अर्थमंत्र्यांची घोषणा

Subscribe

Goods And Service Tax on Pencil and sharpener decreases | अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, जूनसाठी १६ हजार ९८२ कोटी रुपयांसहित सर्व जीएसटी भरपाई केली जाणार आहे.

Goods And Service Tax on Pencil and sharpener decreases | नवी दिल्ली – गूळ, पेन्सिल, शार्पनर, आणि ट्रेकिंग डिव्हाईसवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात या स्टेशनरी वस्तुंच्या किमती कमी होणार आहेत. जीएसटी परिषदेची ४९ वी बैठक (49th Meeting of GST Council) नुकतीच पार पडली, यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा – SBI ने लॉंच केली धांसू FD स्कीम, ४०० दिवसांसाठी मिळेल ७.६० टक्क्यांपर्यंत व्याज, ‘या’ तारखेपर्यंत संधी

- Advertisement -

जीसएटी परिषदेची बैठक पार पडल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaraman) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी बैठकीतील ठरलेल्या निर्णयांची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, लिक्विड गूळ हा उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतील गूळ उत्पादकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सीलबंद आणि लेबल असलेल्या गुळांवर ५ टक्के जीएसटी असेल तर, खुल्या पॅकेटवर शून्य जीएसटी असेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, जूनसाठी १६ हजार ९८२ कोटी रुपयांसहित सर्व जीएसटी भरपाई केली जाणार आहे. तसंच, या बैठकीत पान मसाला आणि गुटखा उद्योगाद्वारे करचोरीची तपासणी करणाऱ्या आणि वस्तू,सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण वर जीओएमने आपला अहवाल सादर केला आहे. या बैठकीला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -