घरदेश-विदेशनोकरवर्गासाठी खुशखबर! ९२ टक्के कंपन्या पगार वाढवण्याच्या तयारीत

नोकरवर्गासाठी खुशखबर! ९२ टक्के कंपन्या पगार वाढवण्याच्या तयारीत

Subscribe

कोरोना संकटात वर्षभरापासून त्रस्त असलेल्या नोकरवर्गासाठी आनंदाची बातमी आहे. एका सर्वेक्षणानुसार, यंदा ९२ टक्के कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये वाढ करण्याची तयारी करत आहेत. डेलॉइटने केलेल्या या सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या कंपन्यांपैकी ९२ टक्के कंपन्यांनी पगार वाढवण्यासंदर्भात विचार करत असल्याचं सांगितलं. गेल्या वर्षी फक्त ६० टक्के कंपन्यांनी सांगितलं होतं.

किती वाढ होणार?

कोरोना साथीच्या नंतर व्यवसायांमध्ये अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारणा होत आहे आणि ग्राहकांचा आत्मविश्वास वाढल्यामुळे कंपन्या कर्मचार्‍यांच्या पगरात सरासरी ७.३ टक्क्यांनी वाढ करू शकतात. डेलॉइटने कामगार आणि मजुरीवरील वाढीच्या ट्रेंडसाठी घेतलेल्या २०२१ च्या पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की यावर्षी पगाराची सरासरी वाढ २०२० मध्ये ४.४ टक्क्यांपेक्षा जास्त असेल, परंतु २०१९ मध्ये ६.६ टक्क्यांपेक्षा कमी असेल.

- Advertisement -

२० टक्के कंपन्या चांगली वाढ करणार

आर्थिक स्थिती अपेक्षेपेक्षा वेगवान सुधारणा, ग्राहकांचा आत्मविश्वास वाढणे आणि चांगले मार्जिन यामुळे कंपन्यांनी त्यांचे पगार वाढीचे बजेट वाढविले आहे. निकालांनुसार २० टक्के कंपन्यांनी यावर्षी पगार दुप्पट वाढवण्याची योजना आखली आहे, तर २०२० मध्ये हा आकडा केवळ १२ टक्के होता. सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षी पगारामध्ये वाढ न करणाऱ्या कंपन्यांपैकी एक तृतीयांश कंपन्यांनी यावर्षी त्यांना जास्त वाढ किंवा बोनसच्या स्वरूपात भरपाई करण्याची तयारी केली आहे. डिसेंबर २०२० मध्ये या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आणि त्यात सात विभाग आणि २५ उप-क्षेत्रांतील सुमारे ४०० कंपन्यांचा सहभाग होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -